पान:Aagarakar.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८१

करून कां दाखवीत नाहीं ?


स्वप्रयत्नाच्या हत्यारानें करावें आणि दुसयांनीं सरकारी हत्याराची हवी तितकी मदत घ्यावी, हें म्हणणे वाजवी नाहीं ! सरकारी हत्यार न वापरण्याचे दिवस येतील तेव्हां ते सान्यांसच येतील ! आज त्यावांचून कोणाच्या हातून कांहींच होण्यासारखे नाहीं, हें सूक्ष्म विचाराअंतीं प्रत्येक समंजस मनुष्यास समजण्यासारखें आहे. सगळे पैलू साफ झाल्याखेरीज समाजखडा कोहिनुरा- प्रमाणें कधींच चमकूं लागणार नाहीं, हें ज्यानें त्याने ध्यानांत वागवून, आपापल्या पैलूवर होईल तितकी मेहनत करीत असावें, आणि मत्सर व क्षुद्र बुद्धि यांचा त्याग करून, दुसऱ्यास होईल तितका हातभार लावावा, हाच सुधारणेचा अत्यंत प्रशस्त मार्ग होय.