पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






१०.
शेवटचा निझाम

 हैदराबाद संस्थानचे शेवटचे राजे व अधिपती मीर उस्मान अलीखाँ हे त्या संस्थानचे सातवे राजे होते. निझाम उस्मान अली श्रीमंती आणि चिक्कूपणा ह्यासाठी सर्वत्र अतिशय प्रसिद्ध आहेत. संस्थानाचे वार्षिक उत्पन्न २५ कोटी रुपये होते. पण त्याखेरीज उस्मान अलीचे खाजगी उत्पन्न निराळे असे दीड कोटी रुपयांचे असे. निझामची खाजगी इस्टेटही दोन अब्ज रुपयांच्या आसपास असे. जगातील अत्यंत श्रीमंत माणूस असा त्यांचा उल्लेख होई. उस्मानअली नानाविध मार्गांनी पैसा सावडीत, एकत्र करीत. पण स्वतः अतिशय साधे राहात. कमालीचा कद्रूपणा ह्याहीसाठी ते प्रसिद्ध होते. आख्यायिकांनी एखाद्याचे व्यक्तिमत्त्व असे काही झाकोळून जाते की त्यामुळे सत्याकडे डोळेझाक होऊ लागते.

 उस्मानअलीकडे कद्रू व श्रीमंत, लहरी व अफूवाज संस्थानिक म्हणून पाहणे धोक्याचे आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी, दूरदृष्टीचा, चतुर व पाताळयंत्री मुत्सद्दी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. निझाम हा जनतेचा शत्रू हे जरी मान्य केले आणि त्याचा विजय हा दीड कोटी प्रजेच्या कायम गुलामीचा ताम्रपट झाला असता हे जरी मान्य केले तरी प्रतिस्पर्ध्याची कुवत व त्यांचा दर्जा आपण विसरू नये. चिवटपणा, सावधपणा, धूर्तता ह्याबाबत उस्मान अली सर्वांना पुरून उरणारे गृहस्थ होते. शस्त्रसामर्थ्यात त्यांचा निभाव लागला नाही म्हणूनच ते पराभूत झाले.

 निझाम उस्मान अली हा मूलतः महत्त्वाकांक्षी माणूस. पहिला निझाम मीर कमरुद्दीन (हा आसफजहा अव्वल म्हणून ओळखला जातो) ज्याप्रमाणे महत्त्वाकांक्षी

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ९८