पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






७.
कुरुंद्यात स्वातंत्र्य आले

 कुरुंदा माझे परंपरागत राहते गाव. निजाम हैदराबादमधील परभणी जिल्ह्यात ते आहे. यंदा आपण स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव साजरा करीत आहो. त्यावेळी सगळ्या जुन्या आठवणी उजळून निघणे स्वाभाविक आहे. संस्थानाच्या बाहेर राहणाऱ्या जनतेला स्वातंत्र्य १५ ऑगस्टला मिळाले. आमच्यासाठी मुक्ततेचा हा क्षण तेरा महिन्यानंतर सप्टेंबर १७ ला पोलिस अॅक्शनमुळे आला. माझ्या गावाला जेव्हा ही आनंदाची बातमी कळली तेव्हा मी हैदराबादला होतो. पण नंतर जेव्हा मी कुरुंद्याला आलो तेव्हा माहिती विचारून घेतला त्या आधारेच पुढचे वर्णन लिहिले आहे. दोन स्वातंत्र्यातील भावनेचा आणि जाणिवेचा फरक मात्र विचारात घेतला पाहिजे. भारतीय जनतेसाठी स्वातंत्र्याचा क्षण अतीव दुःखाचा आणि निराशेचा होता. देशाची फाळणी झालेली होती, निर्वासितांचे लोंढे येत होते. जातीय दंगली चालू होत्या. हे दृश्य मोठे सुखद नव्हते. अंतःकरणात शोक, मनावर ताण आणि चेहऱ्यावर ओढून ताणून आणलेले हसू असे स्वातंत्र्याचे स्वागत करणे भाग होते. आमच्यासाठी सारे भोगून, पाहून, सहन झालेले होते. अत्याचार हेच आमच्यासमोर नित्य जीवन होते. स्वातंत्र्य ही सर्व दुःखांची समाप्ती होती. आनंद मनात मावणेच शक्य नव्हते. स्वातंत्र्य ही आमच्यासाठी याची देही याची डोळा सुखाची पर्वणी होती. आनंदाने नाचा हे कुणाला सांगण्याची गरजच नव्हती. आम्ही शतकांच्या अंधारातून लख्ख प्रकाशात येत होतो.

 भारतीय स्वातंत्र्याची घोषणा जूनमध्ये झाली. त्यापूर्वी काही दिवस इंग्रजी राज्य

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ६९