पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने

 कै. प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्या "हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन" या ग्रंथाची दुसरी आवृत्ती वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे. प्रकाशन व्यवसायात उतरल्यानंतर अल्पकाळात आम्हाला कुरुंदकर गुरुजींसारख्या प्रख्यात विचारवंताचा ग्रंथ प्रकाशनाची संधी मिळाली ही घटना आनंददायक आहे. कुरुंदकर गुरुजींचा जुना परिचय आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांशी असलेले आमचे जिव्हाळ्याचे संबंध यामुळेच हे शक्य झाले आहे.

 आमच्यासारख्या नवोदित प्रकाशकाच्या कामावर विश्वास ठेवून श्रीमती प्रभाताई कुरुंदकर वहिनींनी सरांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे अधिकार आम्हाला देऊन दाखविलेला विश्वास, आम्हाला भविष्यात प्रेरणादायी ठरणार आहे. त्याचबरोबर मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेशचे प्रा. द. पं. जोशी व प्रा. डॉ. पद्माकर दादेगावकर यांनी प्रेमाने या आवृत्तीचे अधिकार आमच्याकडे सोपविण्याबद्दल संमती दर्शविली त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

 या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने काही गोष्टी प्रारंभीच स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते. त्या म्हणजे प्रा. द. पं. जोशी यांनी जो ग्रंथ संपादित केला तो आम्ही अगदी जसाच्या तसा पुनर्मुद्रित केला आहे. त्यात कुठेही फेरबदल केले नाहीत. यासंदर्भात श्री जोशी सरांशी चर्चा झाली तेंव्हा त्यांनी या विषयावर गेल्या १५ वर्षांत झालेल्या नवीन संशोधनाचा, प्रकाशित ग्रंथांचा आढावा घेऊन परिशिष्टात ती माहिती द्यावी म्हणजे नव्या परिस्थितीत जुने नवे संदर्भ अधिक स्पष्ट होतील असे सांगितले होते. हा आढावा त्यांनीच घेण्याचे मान्यही केले होते. परंतु त्यांची प्रकृती ठीक नसल्याने "त्यांनी सहा महिन्यात ही आवृत्ती संपून जाईल. आपण तिसऱ्या आवृत्तीत परिशिष्ट जोडू" असे सांगून सदिच्छाही व्यक्त केल्या.

 याशिवाय स्वातंत्र्य. सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांनी उदार मनाने आम्हाला सदिच्छा दिल्या. प्रा. भुजंग वाडीकर, प्रा. दत्ता भगत, प्रा. फ. मु. शिंदे, श्री. महावीर जोंधळे, श्री. चक्रधर दळवी, श्री. सूर्यकांत सराफ, श्री. भालचंद्र देशपांडे, अॅड. शेषराव मोरे, प्रा. सौ. श्यामल कुरुंदकर-पत्की, प्रा. सौ. तेजस्विनी देव, श्री. विश्वास कुरुंदकर (किर्लोस्कर, पुणे), श्री. सुरेश सावंत, प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, प्रा. माधव. कृष्ण सावरगावकर, श्री. प्रभाकर रावके, श्री. सुधाकर डोईफोडे, श्री. एल. के. कुलकर्णी, प्रा. राम जाधव, प्रा. भगवान काळे यांनी वेळॊवेळी प्रोत्साहन दिले. याशिवाय मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष अॅड. प्रताप वांगर, उपजिल्हाधिकारी दिलीप शिंदे. स्वा. सै. नाथप्रसाद दीक्षित. प्रा. प्रकाश कामताकर, डा. मनसुख आचलिया यांनी अनमोल सहकार्य केल्यामुळेच हे ग्रंथरूप