पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/226

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काळात पुन्हा वाटाघाटी चालू झाल्या. या वाटाघाटीत स्पष्ट भूमिका घेतली असेल तर ती जवाहरलाल नेहरूंनी. त्यांनी हैदराबाद शिष्टमंडळाला सांगितले, तुमच्या समोर पर्याय दोन. एक, तुम्ही उरलेल्या संस्थानिकांबरोबर भारतात विलीन होऊन जावे. दुसरा, रझाकार संघटनेवर तात्काल बंदी आणावी. संस्थानी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते सोडावेत. कायदा तयार करून प्रौढ मतदानावर आधारलेली निवडणूक घ्यावी. हे जे जनतेने लोकनियुक्त मंत्रिमंडळ येईल त्या मंत्रिमंडळाने हैदराबादचे भवितव्य ठरवावे. ते जे ठरवतील ते आम्ही मान्य करू. तिसरा पर्याय नाही. त्यावर छत्तारीचे नबाव म्हणाले, दोन्ही पर्यायांचा अर्थ हैदराबादने भारतात विलीन झाले पाहिजे हाच आहे. नेहरू म्हणाले, हैदराबाद जर भारतात विलीन झाले नाही तर भारतीय प्रदेशाची सलगताच निर्माण होत नाही. आमच्या प्रादेशिक सलगतेवर आम्ही तडजोड करू ही तुमची अपेक्षाच चुकीची आहे.

 सगळ्यात मृदू मनाचे म्हणून विख्यात जे भारतीय नेते, त्यांचे हे मत. नेहरू हे सौम्य बोलण्यासाठीच प्रसिद्ध. अधिकृत वाटाघाटीत सामान्यपणे सरदार पटेल गप्पच राहात. हैदराबादची शिष्टमंडळे कधी खासगी बैठकीत त्यांना भेटली तर ते म्हणत : तुम्ही ही वेळ वाया घालवीत आहात. माऊंटबॅटन वेळ घालवीत आहेत व आमचे मेननही निरर्थक गोष्टी करीत आहेत. माऊंटबॅटनच्या हाती काहीही नाही. तुमच्या हाती काही नाही, माझ्या हाती काही नाही. जवाहरलाल नेहरूंच्या हाती काही नाही. सगळे प्रश्न कासिम रझवीच्या हाती आहेत. ते काही तुमच्या या शिष्टमंडळाचे सभासद नाहीत. त्या माणसाने काही प्रतिज्ञा केलेल्या आहेत. आपला शब्द दिला आहे. काय करायचे ते त्यांचे ठरलेले आहे. शिष्टाचार म्हणून वाटाघाटी करून ते आता काय ते करणार आहेत. अशा प्रकारे वल्लभभाई शिष्टमंडळांना टिंगलीने खाजगीत बोलत. सूचना मेनन, माऊंटबॅटन यांच्याकडून येत. हैदराबादच्या निजामाकडून, अलियावर जंगकडून येत.

 वाटाघाटीत अलियावर जंग यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला. त्यानंतरच्या काळात मीर लायकअलींनी तोच प्रस्ताव दिला. मुन्शींच्या पुस्तकात माऊंटबॅटन प्रस्ताव म्हणून त्याचा उल्लेख आहे, पण तो मुळात अलियावर जंगचा प्रस्ताव. हा महत्त्वाचा प्रस्ताव मी पुढे तुम्हाला सांगतो. पण या वाटाघाटी हलेचनात. त्यांना कोठे सीमाच नव्हती. यात मधे एकदा असे ठरले की विलीनीकरणाच्या वाटाघाटी (Instrument of

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२२८