पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/213

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गेले. नाहीतर ते वाचण्याचा संभव होता.

लोकविलक्षण गोष्ट अहे ती याच्या पुढेच घडली. पुंडलीक पाटलांना लोकांनी घरी नेले व पानसरे वारले हे सांगितले तेव्हा पाटलांच्या आईने त्यांचे तोंड पाहायला नकार दिला. तिने निरोप पाठविला, “पानसरे मेला व तू जिवंत परतलास. मला तुझे तोंड पाहायचे नाही. तूही प्राण का दिले नाहीस?" पुंडलीकराव अनेक महिने हॉस्पिटलमध्ये होते. आईची समजूत पटवून तिला भेटीला नेण्यासाठी पुरते तीन महिने लागले. एवढी या बाईची पानसरेवर निष्ठा होती. असो. पुढे पुंडलिकरावांनी निवडणूक लढविली तीत ते हरले. आणि नंतर एका मोटर अपघातात ते मृत्यू पावले. याच अपघातात जीवनराव बोधनकर जखमी झाले. ते वर्षभराच्या औषधोपचारानंतर मुष्किलीने वाचले. या गोविंदराव पानसऱ्यांंपासून आमच्या लढ्यातील हौतात्म्य चालू होते. अत्याचाराचे पर्व इथूनच चालू होते. किती माणसे गेली त्याची गणती नाही. याच मालेतील शेवटचा अत्याचार म्हणजे शोईबुल्लाखान यांचा बावीस ऑगस्ट अठेचाळीसला हैदराबादेत भर रस्त्यावर झालेला खून.

 शोईबुल्लाखान हे मुसलमानांतील अपवाद होते. संस्थानी काँग्रेसबरोबर फारशी मुसलमान मंडळी कोणी नव्हती. पण हे शोईबुल्ला होते. दुसरा एक मोठा मुसलमान नेता म्हणजे सिराजुल हुसेन तिरमिजी. या तिरमिजींना ऐन आंदोलनाआधी शांतपणे मरण्याची संधी लाभली. हे स्वामीजी पेक्षा मोठे होते. त्यांच्या सहकाऱ्यांपैकी होते. जून सत्तेचाळीसला हे आजारी पडून वारले. ज्या जागी आंदोलनाचा ठराव पास झाला त्या जागेचे नाव तिरमिजीनगर असे ठेवलेले होते ते यांच्या स्मरणासाठी. हे तिरमिजी खिलाफतच्या चळवळीमधून गांधींच्याकडे आकृष्ट झाले होते. पुढच्या काळात सातत्याने काँग्रेसबरोबर राहिले होते. ते तेव्हा वारले नसते तर त्यांना शांतपणे मरण्याची संधी लाभली असती असे नाही. त्यांचा खून झाला असता. तिरमिजी यांच्याबरोबर एक पठाण गांधीजींचा भक्त झाला होता. ज्या शोईबुल्लाखानकडे आपण जात आहोतो . पठाणाचा मुलगा. तिरमिजींच्या भोवती असणारे शिया पठाण यांच्यापैकी एक शोईबुल्लाखान ऐन हैदराबाद शहरामध्ये कासिम रझवीच्या मताविरुद्ध एक साप्ताहिक काढीत असे. या साप्ताहिकात निजामाने मूर्खपणा सोडून भारता व्हावे या धोरणाचा पाठपुरावा आणि कासिम रझवीवर कठोर टीका हो कासिम रझवीने एकदा ताकीद दिली की, आमच्या विरुद्ध जी जीभ उच्चार करील ती

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२१५