पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/211

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशिक्षित सैन्याची आवश्यकता नसते. फक्त अत्याचारांना प्रेरित करणारा नेता हवा असतो. तसा कासिम रझवी होता. याच्या बाजूला सर्व सैन्याचे नेतृत्व ज्यांच्याकडे होते ते एल.इद्रुस हे सरसेनापती होते. त्याच्याच बाजूला इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस दिनयारजंग होते. ही अशी निजामाची संरक्षणयंत्रणा होती. या संरक्षणफळीच्या द्वारे आंदोलन सुरू होण्याच्या आधीपासून जनतेवर अत्याचार चालू होते आणि आंदोलन सुरू झाल्यावर ते वाढत गेले. म्हणून जून सत्तेचाळीसपेक्षा लढा सुरू झाल्यावर ऑगस्ट/सप्टेंबर सत्तेचाळीसमध्ये अत्याचारांचे प्रमाण एकदम फारच वाढले. असे वाढत वाढत अठेचाळीसच्या एप्रिलमध्ये अत्याचारांचा कळस झाल्यावर त्या वेळच्या भारत सरकारने एक श्वेतपत्रिका प्रकाशित केली. यापेक्षा जास्त अत्याचार होणेच शक्य नाही. हैदराबादमध्ये फक्त गुंडांचे आणि अत्याचारांचे राज्यच चालू आहे अशा जाणिवेने हिचे प्रकाशन झालेले आहे. कासिम रझवीच्या रझाकार दलावर कोणतेही कायदेशीर बंधन नव्हते. त्याने केलेल्या अत्याचाराबाबत जनतेची बाजू पाहिली तर निरनिराळ्या जिल्ह्यांत निरनिराळ्या गावी घडलेल्या अत्याचारांची यादी वाचायला तीन दिवसही पुरणार नाहीत. तेव्हा श्वेतपत्रिकेत ज्या अत्याचारांच्या बाबी नोंदलेल्या आहेत, ज्यांची खातरजमा भारत सरकारने स्वतः करून घेतलेली आहे, त्यांच्यापैकीच मी एक-दोन सांगतो. आपल्या परभणी जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात गुडा नावाचे गाव आहे. एके दिवशी शेकडो रझाकार त्या गावावर चाल करून गेले. त्यांनी सगळे गाव घेरले. त्या गावामध्ये जेवढी माणसे सापडली तेवढी सगळी त्यांनी एका विहिरीत टाकली. नंतर त्यांच्यावर कडबा टाकला आणि तो पेटवून दिला. कडबा पेटला आणि त्याखाली पडलेली सगळी माणसेही मेली. नंतर रझाकारांनी सर्व गाव जाळून टाकले. गावातील चारपाच लोक त्या दिवशी बाहेरगावी गेले होते तेवढे वाचले. बाकी सर्व गाव संपले.

 श्वेतपत्रिकेत नोंदलेली दुसरी घटना बिदंर जिल्ह्यातली आहे. या जिल्ह्यातील एक


  • ही श्वेतपत्रिका तयार करण्यात हैदराबादेतील Pleaders' Protest Committees सभासद कारणीभूत होते. किंबहुना सरदारांनी जशी सशस्त्र चळवळ सांभाळली तशीच सनदशीर चळवळ देखील सांभाळली.

- संपादक

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२१३