पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/193

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सोडवून आणण्याचे काम माझे. बायकामुलांना पाचशे रुपये घरपोच मिळतील. दरमहा पुतण्याची काकावर भरपूर श्रद्धा होती. पण निजामाचे त्यांच्याकडे लक्ष जाताच त्याने आपल्या दूताकरवी त्यांना बोलावून घेतले आणि सांगितले. तुम्ही जर तीन वर्षे गप्प बसाल तर मी तुम्हाला हायकोर्टाचे न्यायमूर्ती करीन. यांनी ते मान्य केले आणि ते हायकोर्टाचे न्यायाधीश झाले.

 निजामाचे संस्थान संपवण्याच्या दृष्टीने राजकीय आंदोलन झालेच पाहिजे असा आग्रह गांधींकडे धरणारे तिसरे गृहस्थ दत्तो अप्पाजी तुळजापूरकर. यांना वरखाली सांभाळणारे कुणी नसल्याने अटक झाली व ते हद्दपार झाले. उर्वरित सर्व आयुष्य हैदराबाद संस्थानच्या बाहेर राहून त्यांनी 'माझे रामायण' सारख्या कादंबऱ्या लिहिल्या. अच्युत बळवंत कोल्हटकरांच्या वृत्तपत्रामध्ये जे 'वहिनीची पत्रे' असे सदर आहे त्यांतील बहुसंख्य पत्रे दत्तो अप्पाजी तुळजापूरकरांची आहेत. यांची हद्दपारी आहे. तिचे महत्त्व असे की; राजकीय कारणासाठी हैदराबाद संस्थानच्या हद्दपार होणारे हे पहिले मुलकी गृहस्थ. या अशा गडबडी चालू होत्या पण हैदराबाद संस्थानमध्ये राजकीय संघटना उभी करायला गांधी परवानगी देत नव्हते. गांधींची परवानगी नाही म्हणून संघटना नाही, मग हैदराबादच्या लोकांनी करावयाचे काय? शैक्षणिक उद्योग करा. शाळा काढा. यातूनच विवेकवर्धिनी संस्था निघाली आहे. वामनराव नाईकांनी ही शाळा काढण्यात पुढाकार घेतला, पण ते स्वतः संस्थेचे अध्यक्ष झाले नाहीत. त्यांनी पन्नालाल पित्ती यांना संस्थापक अध्यक्ष केले. पन्नालाल पित्ती निजामाच्या परवानगीशिवाय अध्यक्ष व्हायला तयार नव्हते. म्हणून वामनराव नाईकांती राममनोहर लोहिया यांच्या वडिलांकडून पित्तींवर वजन आणले. राममनोहर लोहियांचे वडील उत्तरेकडील बडे भांडवलदार, कारखानदार वगैरे होते. मुलगा समाजवादी निघाला हा प्रश्न वेगळा. आपल्यापैकी अनेकांना हे माहीत असेल की लोहियांची काही पुस्तके हैदराबादहून प्रकाशित झाली आहेत. हैदराबादमध्ये लोहिया दोन-दोन तीन-तीन महिने सलग राहात. त्यांच्या वडिलांच्या इस्टेटीचा जो विश्वस्तनिधी (Trust) होता त्याचे प्रमुख विश्वस्त पन्नालाल पित्ती होते. पित्तींची मुले हैदराबादला. तेव्हा हाही नातेसंबंध लक्षात घ्या. पित्ती विवेकवर्धिनीचे अध्यक्ष झाले* आणि प्रताप गिरींना त्यांनी उपाध्यक्ष


  • कोषाध्यक्ष
    हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन