पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्थानच्या एकूण उत्पन्नाचा बराच मोठा लचका निजाम स्वतःच्या वैयक्तिक उत्पन्नासाठी घेत असे आणि त्या पैशाची जगभर व्यापारासाठी गुंतवणूक करीत असे. या मार्गाने संस्थानची सरकारी संपत्ती वगळता निजामाने स्वतःची वैयक्तिक संपत्ती म्हणून प्रचंड साठा केलेला होता. जगातला सर्वांत सधन माणूस म्हणून निजाम ओळखला जात असे. निजामाची ही वैयक्तिक संपत्ती तीन अब्जांच्या आसपास होती. यांपैकी दोन अब्ज भारताच्या बाहेर निरनिराळ्या उद्योगधंद्यांत गुंतविले होते. ही गुंतवणूक सर्व जगभर केलेली होती.

 श्रीमंती हा निजामाचा एक भाग झाला. दुसरा भाग असा की संपूर्ण संस्थानामध्ये मुसलमानांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयोग निजामाने पद्धतशीरपणे पार पाडला होता. मुसलमानांविषयी त्याला फार प्रेम वाटत होते असा याचा अर्थ नव्हे. निजामाच्या कारकीर्दीतसुद्धा मुसलमान समाजाचा फार मोठा भाग हमाली करणे, मजुरी करणे, टांगे चालविणे, घरकाम करणे, पानाचे दुकान चालविणे, चपराशी बनणे असेच व्यवसाय करीत असे. मुसलमान संस्कृतीला नपुसकांची आवश्यकता असते. यासाठी हैदराबादमध्ये दहा हजार हिजडेही गोळा केलेले होते. या सर्वांच्या प्रेमाने मुसलमान समाजाच्या उन्नतीसाठी निजामाने काही प्रयत्न केले असे नाही. पण त्याने असा आभास निर्माण केला की, हे राज्य मुसलमानांचे आहे. हा आभास निर्माण करतानाच त्याने मुस्लिम प्रभुत्व निर्माण करण्यासाठी कोणते पद्धतशीर प्रयत्न केले? संस्थानात जे मुसलमान जहागिरदार होते त्यांच्या बाजूला नवे मुसलमान जमीनदार तयार करण्याची त्याने योजना आखली. यासाठी त्याने सावकारीच्या क्षेत्रात मुसलमानांना प्रवेश करायला उत्तेजन दिले. निजामाच्या पूर्वी संस्थानात अरब, पठाण, रोहिले यांची सावकारी फारशी नव्हती. असलीच तर किरकोळ होती. परंतु ही सावकारी, शेतकऱ्यांना अंकित करण्यासाठी, जहागिरदारांशी संबंध ठेवण्यासाठी व नवा जमीनदार वर्ग उत्पन्न करण्यासाठी उपयोगी आहे हे ओळखून निजामाने अरब, रोहिले, पठाण यांची सावकारी सर्व संस्थानात विकसित होऊ दिली आणि एकेका सावकाराकडे पाचशे, सातशे, हजार एकर जमीन गोळा होऊ दिली. मुसलमान जहागिरदार हा जमीनदार वर्गावर वर्चस्व गाजविणार. मुसलमान सावकार हा जनतेच्या संस्कृतीवर वर्चस्व गाजविणार. या दोन गोष्टी झाल्या. आता सरकारी नोकरांची स्थिती काय होती ते पाहू. ज्या दिवशी निजामाने सत्ता हाती घेतली त्या दिवशी नोकरवर्गामध्ये सुमारे

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१८६