९६ ही रामाची अयोध्या ! होता. लगेच जवळच्या एका दिवाणखान्यांतून, आपल्या आंग्ल दोस्त पंचाय- तनानें परिवेष्टित असा नासिरुद्दीन बादशहा येतांच दरबारांत जमलेले अमीर उमराव, इंग्रज उठून उभे राहिले व सर्वांनी बादशहाला खडी ताजीम दिली. बादशहा सर्वांचे मुजरे घेत घेत सिंहासनावरील आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. रेसिडेन्टहि त्याच्या उजव्या बाजूच्या खुर्चीवर विराजमान झाला. दरबारच्या वहिवाटीस अनुसरून लगेव रेसिडेंटनें चारपांच इंग्रज गृहस्थांस बादशहापुढे आणिलें. हातांत नजर घेऊन हे इंग्रज गृहस्थ बादशहापुढे उभे राहिले. त्यांच्या हातांतील सोन्यांच्या मोहरांच्या नजरेस बादशहाने अंगुलीस्पर्श करतांच वजीर मेहद अल्लीखांने त्या मोहरा सिंहासनाच्या बाजूस असलेल्या एका सोन्याच्या ताटांत ठेवून दिल्या. नंतर बादशहानें उठून मोठ्या अदमीनें त्यांनां शेक-हँड केल्यावर ते आपापल्या जागी जाऊन बसले. हे इंग्रज गृहस्थ स्वस्थानी बसल्यावर अयोध्येतील पिढीजाद अमीरउमराव, मोठमोठे सरदार, जमीनदार, जमिनीपासून लवून बादशहाला तीनतीनदा मुजरा करुन नजर घेऊन सिंहासनापाशी आले. या बड्या बडया अमीरउमरावांनी आणलेल्या मूल्यवान् नजरनजराण्याकडे बादशहानें ढुंकूनहि पाहिले नाही, की, त्यांपैकी एकाच्यादि नजरेला अंगुली- स्पर्श केला नाहीं. नायब दिवाण राजा मेवाराम सिंह हा ती नजर घेऊन सिंहा- सनापाशी ठेवित होता. अमीरउमराव मोठ्या अदबीने मुजरे करित होते. बादशहा सिंहासनावर बसल्याबसल्या हास्य मुखानें रेसिडेंटाशीं गप्पागोष्टी करित अमीरउमरावांच्या मुजयांस उगीच किंचित् मान हालवित होता. कित्येकांच्या मुजऱ्यांकडे तर त्याचें लक्ष्यहि नव्हतें, अगर लक्ष्य देण्याची त्याला आवश्यकता बाटली नाही. • नजराण्याचा विधि उरकल्यावर बादशहाने उठून रेसिडेन्टच्या गळ्यांत एक सुवर्णहार घातला. रेसिडेन्टानेंहि तसाच एक हार नासीरच्या गळ्यांत घातला. तदनंतर उभयतां सिंहासनावरून उतरून खाली आले. बादशहाने आपल्या सवंगड्यांस, अमीरउमरावांस रौप्यहार अर्पण केले. हार अर्पण करण्याचा हा विधि संपतांच रेसिडेंटानें 'गुडबाय ह्मणून बादशहाचा निरोप घेतला. बादशहा त्याला पोचविण्यास दरवाजापर्यंत गेला. रेसिडेन्टसाहेब गार्डीत बसतांच 'खुदा हाफेज' ह्मणून बादशहानें त्याला निरोप दिला. तत्क्षण दरबार विसर्जन झाला. ,
पान:ही रामाची अयोध्या.pdf/९५
Appearance