९२ ही रामाची अयोध्या ! दृष्टीसमोर असतां आमच्या देशांतील स्त्रियांनां भीरू असे कोणाच्यानें ह्मणवेल ? भीमार्जुनांचें तेज, विश्वामित्रपरशुरामादिकांचा पराक्रम, अद्यापीहि आमच्या अंगी मूर्तिमान वास करित आहे. भारतवासी नष्टवीर्य झाले असें ह्मणण्याचे धाडस याउपर कोणाच्यानेंहि करवणार नाहीं ! आजहि सुरधुनी भागीरथी गंगेच्या प्रवाहाप्रमाणें आर्योचें रक्त आमच्या शरीरांतील नाड्यांमधून जोरानें वहात आहे, सळसळत आहे - इत्यादि इत्यादि. "" जवळजवळ एक महिनापावेतों निरनिराळ्या वर्तमानपत्रांत निरनिराळ्या प्रकारें या विजयगंजच्या युद्धासंबंधीं कडाक्याची चर्चा चालली होती. इकडे ह्या गडबडीच्या पूर्वी कांहीं दिवस अयोध्येच्या भावी व्यवस्थेसंबंधों कोर्ट ऑफ डिरेक्टरकडून एक लांबलचक खरीता गव्हर्नर जनरलकडे येऊन थडकला होता. या वेळीं लार्ड विल्यम बेंटिक हा गव्हर्नरजनरलाच्या जाग असून सर चार्ल्स थिओफिलास मेटकॉफ हा त्याच्या कौन्सिलचा मेंबर होता. ह्यांच्या राज्यकार- भाराचें धोरण पाहून हिंदुस्थानचे लोक यांनां ' बुध राजा, आणि बृहस्पति मंत्री असे ह्मणत असत. लवकरच गव्हर्नर जनरलानें अयोध्येच्या भावी व्यवस्थेसंबंधी विचार करण्या- करितां कन्सिलची बैठक भरविली. दरवाजे बंद करून या कौन्सिलच्या बैठकीत कडाक्याने चर्चा चालू झाली. या सभांमध्ये कोणीं काय सूचना आणली, कोण काय बोलला, व त्याचा निर्णय काय झाला, हें लोकांस कळण्यास कांहींच मार्ग नव्हता. लोकांत अशी कंडी उठली होती कीं, कोर्ट ऑफ डिरेक्टर्सनी अयोध्या ब्रिटीश राज्यांत सामील करण्याविषयों हुकून पाठविला होता; परंतु लॉर्ड विल्यम वेंडिक त्या गोष्टीला असंमत होऊन त्याने कोर्ट ऑफ डिरेक्टर्सनां लिहिलें:- 26
- आमच्या राज्यपद्धतीपेक्षां मुसलमानांची राज्यपद्धति पुष्कळ बाबतीत
श्रेष्ठ प्रकारची होती. मुसलमान राजांनी हिंदुस्थानांतील प्रजेस सर्व प्रकारचे
- Lord William Bentinck in his evidence before a Com-
mittee of the House of Commons in 1837, said —“ In many respects the Mahomedans surpassed our rule, they admitted them ( the natives) to all privileges; the interests and sym- pathies of the conquerors and the conquered became iden- tified. Our policy, on the contrary, has been the reverse