८८. ही रामाची अयोध्या ! धरून पाहिलें, तो त्याला श्वासाचा भास झाला नाही. त्यानें सोबत्यांस सांगितलें झालें, आटोपलें! साहेब आपल्याला सोडून गेले !” 66 साऱ्या मंडळीनें दुःखाचा एकच हंबरडा फोडून भरभर खांचंत माती लोटली व खांच भरतांच माती पायानें तुडवून तुडवून जमीन पूर्ववत् करून खिन्न मनाने मंडळी दुकानांत परत आली. आपल्या धन्याच्या ह्या अकाली आणि दुःखद मृत्युबद्दल सर्वजण फारच हळहळत होते! एकापेक्षां एकेक आपल्या शोकाचे प्रदर्शन करूं लागला व धन्याचे एकेक गुण आठवून मोठमोठ्यानें हंबरडे फोडूं लागला. कांही मंडळी आहाराची तयारी करण्यांत गुंतली होती, हे पाहल्याने सांगितलेच आहे.
- त्यांनीं शिजविलेलें अन्न निवून गार होऊं लागले तरी कोणीहि जवावयास ह्मणून
उठेना. धन्याच्या मृत्यूच्या दुःखापुढे जेवण काय आणि खाणें काय, कोणाला कांहींच सुचत नव्हतें ! शेवटी आपण जेवायास उठत नसल्यास मन्सुरअल्ली पाणीहि प्यावयास राजी नाही हे पाहून केवळ त्याच्यासाठी ह्मणून युसफअल्ली फक्त घोटभर पाणी पिण्यास कबूल झाला ! अकबरअल्लीसाठी इलाहिबक्षाने आपला शोक गिळला, फत्तेखां दुसऱ्या एकासाठीं कबूल झाला व शेवटीं ही मंडळी केवळ दुसऱ्यासाठी ह्मणून घोटभर पाणी प्यावयाला व घांसभर अन्न खावयाला एकदाची उठली. जेवतांनाहि बिचारे एकसारखे रडत होते. दुःखानें त्यांचें चित्त इतकें व्यग्र झाले होतें कीं, त्या दुःखभरांत शेवटी वाढणारांच्या वांट्यास कांहीहि अन्न राहिलें नाहीं, हे देखील त्यांना कळले नाहीं ! वाढपी बिचारे त्या रात्रीं उपाशी राहिले. दुसरे दिवशी सकाळी ही मंडळी इबराहिमखांच्या कवरेस वंदन करून स्वदेशी गेली !