विजयगंज. ८७ अन् तुं ह्या वेळीं असा रुसून बसतोस, हें बरें दिसते का ? ऊठ, कबर खणण्यास मदत कर. " बापडा काय करतो ! जिवंत माणसास गाडण्यापेक्षां स्नेह्यांकडून होणान्या आपल्या धर्मश्रद्धेच्या उपहासाची त्याला जास्त भीति वाटली व तोहि मोठ्या उत्साहानें खड्डयांतील माती उपसू लागला. चौघांनी मिळून तासा अर्ध्या तासांत सुमारे चार हात लांब, दोन हात रुंद व दोन हात खोल अशी एक खांच खणली व सर्व मंडळी इबराहिमखांच्या प्राणोत्क्रमणाची मोव्या उत्सुकतेनें मार्गप्रतीक्षा करित बसली. कांही वेळानें ही सर्व मंडळी इबराहिखांच्या गाडीपाशी येऊन कानोसा घेऊं लागली. त्यांनां जवळ आलेले पहातांच इबराहिखां अधिकच दीन स्वरानें ह्मणाला “मरतो मरतों ! मी आतां यांतून खास वांचत नाहीं! ह्या बैलांच्या गाडीत माझ्यानें निजवत नाही. पाठीला फार वेदना होतात. खाली जमिनीवर मऊसा बिछाना आंथरून मला निजवा ! भुकेनें माझे प्राण चालले आहेत. कुठून तरी एक मुर्गी आणून मला घाला. " एवढे बोलतांना इबराहिमखांला फार श्रम झाले. श्वासोवास जोरानें होऊं लागला. इचराहिमखांचा तो स्वासोच्छ्रास पाहतांच मनसुरअल्ली युसफअल्लीच्या कानांत हलकेच ह्मणतो " उचला, उचला ! आतां वेळ नाहीं. साहेव आत्तां मरतील ! " लगेच दोघांतिघांनी इबराहिमखांचें प्रेत गाडींतून खालों काढलें! इबराहिम- खांला वाटले, हे आपल्याला खालीं बिछान्यावर निजविण्यासाठी उचलून नेत आहेत. तो बापडा अगदर्दी गहाळ झाला होता; बोलण्याची शक्तीहि या वेळीं त्याच्या अंगांत राहिली नव्हती; आणि बिछान्यावर निजविण्यासाठी ज्या अर्थी आपले लोक आपल्याला नेत आहेत, त्याअर्थी त्यांनां आणखी काय सांगणार ? आतां लवकरच एक सबंध मुर्गी खाऊन आपण ताजेतवाने होऊं, या मनोराज्यांत त्या तशा वेदनांताह तो मिटक्या मारित स्वस्थ होता; परंतु वरील मंडळीनें त्याला एकदम दुकानाच्या मागील बाजूस खोदलेल्या खांचंत नेऊन निजविलें! यावेळी तेथे काळोख होता. इबराहिमखाने डोळे मिटून घेतले होते. थंडगार भुसभुशीत मातीवर निजतांच त्याला आपण मऊ बिछान्यावरच निजलो आहो असे वाटले, ह्मणून तो कांहीं बोलला नाही. युसफअली नें इबराहिमखांच्या नाकावर बोट
पान:ही रामाची अयोध्या.pdf/८५
Appearance