Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विजयगंज. ८१ चांदकुमारीनें हा वेळपर्यंत तोंडांत पाण्याचा थेंबहि घेतला नव्हता. बद्दी येतांच कांहीं फळफळावळीने एक ताट भरून ती तिची वाट पहात बसली होती. नारायणकुमारीला स्नान करून येण्यास बराच दिलंब झालेला पाहून चांदकुमारी आतां मंदिरांत आली. तिला पहातांच नारायणकुमारी उठली व दोघीहि महालांत आल्या. नारायणकुमारीच्या मनांत आज मुळींच आहार करावयाचा नव्हता; परंतु आपण उपाशी राहिल्यास चांदकुमारी कांहींहि खाणार नाहीं असे पहातांच तिनें आपला हट्ट सोडला. नंतर दोघांहि बहिणींनी थोडासा फलाहार केला. त्या रात्रीं अर्थातच त्यांनां झोप आली नाहीं. साऱ्या दिवसांत घडलेल्या गोष्टी उभयतां बहिणी मोठया उत्सुकतेनें एकमेकांस विचारित होत्या व सांगत होत्या. गोष्टी सांगतां सांगतां रात्र संपून गेली, हे त्यांना कळले देखील नाहीं ! सुमारे दोन घटका रात्र असतां इबराहिमखां आप या तीसचाळीस लोकांनिशीं किल्लयाच्या पूर्वेच्या दरवाज्यापाशी येऊन पोहोचला. या वेळीं दरवाज्यावर फक्त दोघेच संत्री पहारा करित होते. बाकीचे लोक साच्या दिवसाच्या प्रवासाच्या आणि लढाईच्या श्रमाने अगदी थकून गेले असल्यामुळे विश्रांति घेत पडले होते. गयाप्रसाद आणि कल्याणसिंह ह्यांनां मात्र आज झोप येईना. आपल्या लोकांस विश्रांति घ्यावयास सांगून ते स्वत: जागत बसले होते. किल्लयाच्या पहिल्याच हवेलींतील एका पडशाळेत एका परशांत विस्तव पेटवून त्या शेकाजवळ कडक थंडीत ते कांही विचार करित वसले होते. त्यांच्या गोष्टी आणखी दुसऱ्या कसल्या असणार ? इंग्रजांचें सैन्य किल्ल्यावर चालून येईल काय ? आल्यास आपली काय अवस्था होईल? आपण त्यांनां तोंड कसे द्यावें? इत्यादि गोष्टींचा ते उभयतां खल करित आहेत, इतक्यांत दरवाज्यावरील एक पहारेकरी 'शत्रूचे लोक आले, सावध रहा!" अर्से ओरडतच आला. गयाप्रसाद आणि कल्याणसिंह तयारीनेच होते. लगेच त्यांनी आपल्या साज्या लोकांस उठविलें व सर्वजण तरवारी, बंदुका घेऊन दरवाज्यापाशीं आले. एवढ्या वेळांत इबाराहिमखांचे लोक किल्यांत घुसले. लगेच भयंकर मारामारी सुरू झाली. "मारा साल्या फिरंग्यांनां! पिटा साल्या काफरांनां !" असा परस्पर गालिवर्षाव होऊं लागला व तरवारीचा खणखणाट आणि बंदुकीचा धडधडाड चालू झाला. इकडे ही गडबड चालू असतां कित्येक लोकांनीं राजमहालांत जाऊन शत्रूचे लोक किल्ल्यांत घुसल्याची राणीला वर्दी दिली. किल्ल्यावर चालून आलेले हे इंग्रजांचे