८० ही रामाची अयोध्या ! ती अतिशयच अधिर झाली व कावरीबावरी होऊन केव्हां राजमहालाच्या बाहेर, तर केव्हां दिवाणखान्यांत, केव्हां पित्याच्या बिछान्यापाशीं तर केव्हां सीता- रामाच्या मंदिरांत, याप्रमाणे एखाद्या वासरूं चुकलेल्या गाईसारखी वणवण फिरूं लागली. जसजशी रात्र वाढू लागली, तसतशी चिचारी चांदकुमारी अधिकाधिक व्यथित होऊन तिच्या मनाची कुशंका अधिकाधिक दृढ होत चाउली, दोन महर रात्रीच्या सुमारास कियामध्यें गडबडीचा अवाज ऐकतांच चांद- कुमारी धात्रतच बाहेर आली. पहाते, तो राणी नारायणकुमारा राजमहालाच्या मुख्य दरवाज्यांत उभी आहे. बहिणीस परत आलेली पाहून चांदकुमारीचें अंतःकरण निरनिराळ्या मनोविकारांनी भरून आलें. डोळ्यांतून झरझर अश्रुप्रवाह सुरू झाला. काही वेळ उभय बहिणी देहभान विसरून गेल्या. कोणीच कांहीं बोलली नाहीं. शुद्धीवर आल्यानंतर नारायणकुमारीने विचारिले “ बाचा कसे आहेत ! त्यांनां पांतील कांही कळलं नाहींना ? " चांदकुमारीहि आतां शुद्धीवर आली. ती ह्मणाली " बाबा सकाळपासून बेशुद्धच आहेत. त्यांनां बिचाऱ्यांना कांह। एक ठाऊक नाहीं. परंतु मी तर अगदी भिऊन गेल्यें होयें. अद्यापि ह्मणजे माझी भीति दूर झाली आहे असं नाहीं – पण ताई, काय झालं तें अगोदर सांग गडे! माझ्या मनांत भलभलत्या वाईट वाईट शंका येत आहेत ! " नारायणकुमारी गंभीर स्वराने ह्मणाली " भिऊं नको ! सीतानाथाच्या कृपेने सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्या. ती सविस्तर हकीगत मागाहून सावकाश सांगेन. नूंहि अझून कांहीं खालं नाहीस. तुं बाबांपाशीं जा, मी स्नान करून ही आल्येंच !” असे ह्मणून राणी नारायणकुमारीने आपल्या एका दासीला धूत वस्त्र आणण्यास सांगून ती पुष्करणीकडे निघाली. त्याप्रमाणे एक दासी धूत वस्त्र आणि दुसरी एक दासी कंदिल घेऊन राणीच्या मागोमाग गेल्या. त्या माघ महिन्याच्या कडक थंडींत, भर मध्यरात्रीं, राणी नारायणकुमारीनें त्या गार पाण्यांत उतरून स्नान केलें. स्नानांनंतर ती तशीच ओल्या वस्त्रानें जवळच असलेल्या सीतारामाच्या मंदिराकडे वळली व सात वेळ मंदिराला प्रदक्षिणा करून मंदिराचा दरवाज्यासमोर जमिनीवर लोटां- गण घालून तिनें साष्टांग नमस्कार घातला. तदनंतर ओले वस्त्र बदलून ती धूत वस्त्र नेसली व दासींस जावयास सांगून मंदिरांत गेली. सीतारामाच्या मंदिरांत या वेळीं फक्त एक लहानशी समई मिणमिण जळत होती. राणी नारायणकुमारी एका दर्भासनावर एकाग्र चित्तानें रामनामाचा जप करित बसली.
पान:ही रामाची अयोध्या.pdf/७८
Appearance