Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ही रामाची अयोध्या ! वरील लहानसें सैन्य सीतापुरच्या किल्ल्यांतून आले होतें. सैन्याच्या पश्चिमभागीं राणी नारायणकुमारी इचा हत्ती होता. इंग्रजांशी लढाई देण्यास आपल्या सेनेचें आधिपत्य स्वीकारून राणी नारायणकुमारी स्वतः रणभूमीवर आली होती. राणी नारायणकुमारीचा या वेळचा तो वीरवेष पहातांच, जणूं भगवती हेमवती असुर- बधार्थ संग्रामस्थलीं प्राप्त झाली आहे, असा भास होत होता ! राणी मधून मधून गयाप्रसाद, कल्याणसिंह यांनां आज्ञा करित होती. शेवटीं विजयगंजच्या पूर्व दिशेस एक कोसावर आपले सैन्य लढाई देण्यासाठी सिद्ध करण्यास राणीनें हुकूम फर्माविला. दिवस मावळण्यास आतां फक्त घटका दोन घटका राहिल्या होत्या. बादशहाचा तालुकदार इबराहिमखां आणि तहसीलदार हिरासिंग आतां बरेच जवळ आले. राणीच्या सैन्यापासून यावेळी ते सुमारें एक कोशावर होते. इचराहिमखां आणि हिरासिंग यांना वाटले होते कीं, इंग्रजांच्या लष्कराचें नांव ऐकतांच जमीनदार व गांवांतील इतर लोक भयभीत होऊन गांव सोडून पळून जातील, आणि आपल्याला थोडक्या लोकांनिशीं जमिनदारप्रभृति धनिक लोकांच्या घरादारांवर हल्ला करून यथास्थित लूट करता येईल; परंतु सीतापुरची राणी युद्ध करण्यास उभी राहिली आहे हे पहातांच ते थक्क झाले ! इंग्रजांच्या सैन्याची अद्यापपर्यंत लढाईस तोंड देण्याची तयारी नव्हती. इबराहिमखां आणि हिरासिंग इंग्रजी सैन्याचा सेनापति मेजर स्मिथ याला सांगत होते हुजूर! या देशचे लोक मोठे पाजी आहेत. महाराज दिग्विजयसिंह आणि राजा हरपालसिंह ह्यांनी केव्हांहि बादशहाला कर दिला नाहीं. वजीर बनमुल्क यांच्या अमलापासून आज तागाईत कोणीहि यांच्याकडून कर वसूल करूं शकला नाहीं. " (6 यांचें याप्रमाणे संभाषण चालले होतें व इकडे राणीचें सैन्य 'जय सीतारामकी जय ! जय महाराणीकी जय!' असा सारखा जयघोष करित होतें. मेजर रिमथ हा मोठा हुषार सेनापति होता. अयोध्येचा महसूल वसूल करण्यासाठी इंग्रजी सैन्याची मदत घेण्यांत आल्यास सेनापतीने फारच हुषारीनें चागावें, गोळी न सोडतां नुसत्या भीतीचें प्रदर्शन करून दुबळ्या प्रजेला भेवडावून युक्तीनें आपला कार्यभाग उरकून घ्यावा, असा गव्हर्नर जनरलाचा स्पष्ट हुकूम होता; आणि त्या हुकुमान्वयें सेनापति मेजर स्मिथ यानें आपल्या सैन्याची रचना करण्यापूर्वीच तोफेचे खाली आवाज काढण्यास आपल्या लोकांस आज्ञा केली. त्याला