Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विजयगंज. ७५ नुझ्या बापाचें कोणीं घेऊन खाल्ले आहे की काय ? जा दुसऱ्या दुकानांत ! सरदाराचें नांव सांगून भवडावयाला आला आहे बेटा ! चल, हो चालता ! " हां हां ह्मणतां चार घटका दिवस आला. पाऊसहि अमळ थांबला. तथापि आकाश अद्याप अभ्राच्छादितच होतें. बाजारांतील सर्व दुकानें उघडली, देवघेव चालू झाली, व रोजच्याप्रमाणें तेथें एकच गोंगाट आणि गडबड सुरू झाली; परंतु आजचा दिवस हा आपल्या क्रयविक्रयाचा शेवटचा दिवस आहे, आज सायंकाळच्या आंत विजयगंजचा बाजार नामशेष होणार, अशी बिचाऱ्या त्या दुकानदारांनी स्वप्नांतहि कल्पना केली नव्हती ! ... हळुहळू दोन प्रहर दिवस आला. दुकानदारांपैकी कोणी स्नान करित आहेत, कोणी भोजन करित आहेत, सारांश, सर्वजण या वेळीं दुपारच्या जेवणाच्या धांदलींत गढून गेले आहेत, इतक्यांत अकस्मात् दूर पश्चिमेच्या बाजूस लोकांची एकच गर्दी झालेली दृष्टीस पडली. हळुहळू लोकांचा तो घोळका विजयगंजकडे येऊं लागला. त्या घोळक्याच्या पुढे असलेले पन्नास घोडेस्वार मोठ्या त्वरेनें विजयगंजकडे दौडत येत होते. त्या लोकांचा तो लष्करी साज पहातांच बाजारांतील लोक बिचारे गर्भगळितच होऊन गेले. हां हां ह्मणतां घोडेस्वार बाजारांत येऊन ठेपले. त्या स्वारांत सर्वांच्यापुढे सीतापुरच्या किल्ल्यांतील मुख्य अधिकारी गयाप्रसाद, ठाकुरप्रसाद आणि कल्याणसिंह हे होते. बाजारांत येतांच हे घाईघाईनें आणि भयभीत मुद्रेनें सर्वांनां सांगू लागले "अहो, पळा, पळा ! बादशहाचे तालुकदार, तहशीलदार, आमील वगैरे लोक बाजार लुटावयास येत आहेत, तुझी आपापल्या वस्तु घेऊन येथून लवकर पळून जा ! दुकानदारांच्या मनाची स्थिति या वेळी काय झाली, त्याची कल्पनाच केली पाहिजे ! बिचाऱ्यांच्या साच्या जन्माची कमाई आणि सारे भांडवल ह्मणजे त्यांच्या दुकानांत असलेला नाना प्रकारचा लहान मोठा माल. तो घेऊन त्यांनां अशा वेळी कुठे पळतां येणार आणि ते कुठे जाणार ? उपायांतर नसल्यामुळे प्रत्येकाला जेवढा कांहीं बोजा उचलून नेतां येण्यासारखा होता तेवढा भरभर बांधून, डोक्यावर पाठीवर घेऊन सर्वजण जीव घेऊन पळून गेले. लोकांच्या भयंकर गोंगाटानें, गडबडीने गजबजून गेलेला तो विजयगंजचा बाजार एका तासाच्या आंतच स्मशानासारखा जनशून्य झाला ! "