Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जगन्नाथशास्त्री. उडवीत. शेवटी नेपाळयुद्ध संपल्यावर इंग्रजांचें बरेंचसे सैन्य यांच्यावर चालून आलें या प्रसंगी महाराज दिग्विजयसिंह आणि राजा हरपालसिंह यांनी सिंहासारखा पराक्रम करून धारातीर्थी शयन केले. बिचाऱ्या वृद्ध गंगाप्रसादाच्या दोन्ही जामातांचा याप्रमाणें अकाली अंत होऊन त्याच्या दोन तरुण मुली विधवा झाल्या. मागील प्रकरणांत परस्परांशी बोलत बसलेल्या ज्या दोघी स्त्रियांचे वर्णन आले · आहे, त्या, गंगाप्रसादाच्या ह्या दोन्ही विधवा कन्याच होत, हे आतां वाचकांच्या लक्ष्यांत आलेच असेल. पहिली स्त्री राजा हरपालसिंहाची पत्नी चांदकुमारी व दुसरी स्त्री महाराज दिग्विजय सिंहाची पत्नी नारायणकुमारी होती. बिचारा गंगाप्रसाद या वेळीं शोकानें, दुःखानें अगदीं जर्जर झाला होता. विपत्तींमागून विपत्ति त्याच्या- वर कोसळत होत्या. पांच वर्षांपूर्वी त्याच्या दोघी तरुण कन्या विधवा झाल्या. पुढे दोन वर्षांनी त्याची धाकटी कन्या मानकुमारी हिचे दरवडेखोरांनी हरण केलें. आज तो महाराज दिग्विजयसिंहाच्या जीर्ण राजमहालांतील एका खोलीत मरणोन्मुख अवस्थेत एका पलंगावर पडला होता. त्याच्या दोघी कन्या नारायणकुमारी आणि चांदकुमारी त्याच्याजवळ बसून मोठ्या प्रेमानें त्याची शुश्रूषा करित होत्या.