Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्राक्कथन. होते. सादतखानानें दिल्लीच्या बादशहाची मर्जी संपादून अयोध्येची सुभेदारी मिळविली व पुढे तो प्रांत तो स्वतःच बळकावून बसला. सादतखानाच्या मागून त्याचा जांवई आणि पुतण्या मनसूर अल्ली सफदरजंग हा अयोध्येचा नवाब झाला. हा सफदरजंग पुढे १७४८ साली दिल्लीचा वजीर झाला होता, म्हणून अयोध्येच्या नबाबांस वजीर ही संज्ञा प्राप्त झाली. सफदरजंगामागून सुजा-उद्- दौला हा अयोध्येचा अधिपति झाला आणि या सुजा-उद्-दौलाच्या कारकिर्दीतच इंग्रजांनी अयोध्येत प्रवेश केला. - या वेळीं दिल्लीचे बादशहा अगदीच दुर्बळ झाले होते. मराठे आपली सत्ता अधिकाधिक वाढवित होते. गिलच्यांनीहि याच संधीस हिंदुस्थानावर स्वाच्या करण्याचा तडाखा लाविला होता व व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीहि याच वेळीं आपल्याला कोठें भुसभुशीत जागा आढळते व तींत बीळ पाडतां येऊन त्या बिळांतू आपण पटकन् घुसतों, अशी तीक्ष्ण दृष्टि लावून अगदर्दी टपून बसली होती. सुजा- उद्-दौला घटकेत मराठ्यांच्या पक्षाला, तर घटकेंत रोहिल्यांकडे, अशी चाळवाचाळव करित होता. याच संधीस इंग्रजांनीं पदच्युत केलेला बंगालचा नवाब कासीम अल्ली हा पाटणा येथे इंग्रजांची कत्तल करून सुजा-उद्-दौला याच्या आश्रयास येऊन राहिला. सुजा-उद्-दौला यानें आपल्याला बंगालप्रांत पुनः मिळवून दिल्यास त्याला स्वारीच्या खर्चासाठी ह्मणून दररोज एक लक्ष रुपये, सारा पाटणा प्रांत आणि ३० लक्ष रुपये रोख देऊं, असें कासीस अट्टीनें बोळणे लाविले. सुजा-उद्-दौला यानें ती गोष्ट मान्य केली व दिल्लीच्या नामधारी बादतहास आपल्या कटांत ओढून घेतलं. याप्रमाणें दिल्लीचा बादशहा शहाआलम, अयोध्येचा नबाब वजीर सुजा-उद्-दौला आणि बंगलचा पदभ्रष्ट नवाब कासीम अली या तिघांनी मिळून बक्सार येथें ता. १६ आक्टोबर इ. स. १७६४ रोजी इंग्रजांशी लढाई दिली. दुर्दैवाने या युद्धांत वरील त्रिकुटाचा पराजय होऊन इंग्रजांनां विजयश्रीनें माळ घातली. पुढे इंग्रजांनी दिल्लीच्या बादशहाला आपल्या पक्षास मिळवून घेऊन दिलीचे सार्वभौम बादशहा ह्या नात्यानें त्याच्याकडून ता. २९ दिसेंबर १७६४ रोजी एक सनद लिहून घेतली. त्या सनदेंत शहा आलम यानें बंगाल, बहार आणि ओरिसा ह्या तीन प्रांतांचें स्वामित्व इंग्रजांस दिले. इंग्रजांनी युक्तीनें या सनदेंत सुजा-उद्-दौला याची सर्व जहागीरहि गोंवून घेतली, व त्याच्या मुलुखापैकी अलहाबाद आणि कोरा हे दोन जिल्हे बादशहास बक्षिस दिले. याप्रमाणे दिल्लीच्या नामधारी बादशहाचें