Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जगन्नाथशास्त्री. ६९ प्रसिद्ध जमीनदाराचा पुत्र राजा हरपालसिंह याच्याबरोबर चांदकुमारीचा विवाह झाला. चांदकुमारीच्या विवाहाच्या वळींच गंगाप्रसादानें निश्चित केले होतें कीं, आतां दोनतीन वर्षांनी जव्हां आपण मानकुमारीचें लग्न करूं, त्याचवेळी आपला मुलगा काशीन थ याचाहि विवाह उरकून घ्यावा. ह्मणून हल्लींपासूनच तो काशीनाथा- साठी एखादी अनुरूप वधु शोवण्याच्या प्रयत्नःस लागला. परंतु मनुष्याचे सर्वच बेत जर सिद्धीस जाते. तर मग या जगांत दुःख कां रहातें ? काशीनाथ हा अगदी आपल्या आजाच्या वळणावर गेला होता. बाळपणा- पासूनच त्याचा अगदीं निरीच्छ आणि शांत स्वभाव असे. सदासर्वदा परोपकार आणि परसेवा करण्यांत काशीनाथ गढलेला असे. स्वसुखाकडे किंवा स्वकल्याणकडे त्याचे लक्ष्य नव्हतें. आपल्या विवाहाचा विचार चालला आहे असे त्याला कळतांच लग्न करण्याची आपली इच्छा नाहीं असें आईपाशीं त्याने स्पष्ट सांगितले आणि तिला असेहि बजाविलें कीं, आपल्याला न जुमानतां तुझी जर बळजबरीने माझा विवाह करण्याचें योजाल तर मी पळून जाईन! काशीनाथाचे असे विचार व्हावयाला अनेक कारणें होतीं. सीतापुर येथे आल्या दिवसापासून भानुमति सदासर्वदा आपल्या वंदनीय सास-याचे गुणानुवाद गात शोकाकुल होऊन रुदन करित असे. सासन्याचा शोध करण्यासाठी चोहैं। कडे माणसे पाठविण्याविषयीं ती गंगाप्रसादाची वारंवार विनवणी करी. हा सारा प्रकार काशीनाथ पहात होता आईकडून त्याला आपल्या आजोबांचं पवित्र वर्तन, दया, स्नेह, धर्मावरील त्यांची श्रद्धा, परोपकार इत्यादि गुणांचे वर्णन वारंवार ऐकू येत होते. त्याचप्रमाणे आजोबा आपल्याला नेहमीं पोटाशी घेऊन आपल्यावर मनस्वी प्रेम करित असत, आपण क्षणभर जवळ नसलों ह्मणजे त्यांची अगदीं वेड्यासारखी अवस्था होई, हे त्याने आईकडून ऐकिलें होतें व या सर्व कारणांमुळे काशीनाथाच्या मनांत आपल्या आजब विषय विलक्षण आदर, श्रद्धा, भक्ति उप्तन्न झाली होती. महा सती भानुमति केव्हांहि पतिनिंदा करित नसे खरी, परंतु सासण्याचे जे ती वरचेवर गुणानुवाद गात असे त्याच्या अगदी विरुद्ध गंगाप्रसादाचें वर्तन काशीनाथ पहात असल्यामुळे अर्थातच त्याला त्यांतील अंतर वळत आले होते व त्यामुळे पित्यावरील त्याची श्रद्धा उडून गेली होती. काशीनाथ बाळपणी नेहमीं ह्मणत असे की, आपले आजोबा खात्रीने जिवंत आहेत, केन्हां ना केव्हां ते आपण हाऊनच स्वदेशी परत येतील. ता पंधरासोळा