Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६५ ही रामाची अयोध्या ! हा मुलगा काशत जन्मल्यामुळे जगन्नाथशाख्याने त्याचे नांव काशीनाथ अर्से -ठोवलें होतें. काशीनाथ सदासवदा आजाबांजवळच असे. भानुमति बिचारी मोठ्या अडचणीत सांपडली. इकडे पतीचा सीतापुरला जाण्याचा तर निश्चय झालेला व श्वशुर कांही केल्या सीतापुरला जाण्यास संमत होईनात! सःसऱ्यास एकटें टाकून जाणे अर्थातच त्या सद्वतनी सुनेला योग्य वाटेना. काशीनाथाला सासऱ्याच्या मांडीवर • बसवून जगन्नाथशाख्याचे घट्ट पाय धरून ती रुदन करित ह्रणाली " आपण आह्मांला टाकूं नका! आपल्याला पाहिलं नाहीं तर बाळ घटकाभरसुद्रां रहाणार नाहीं. थोड्या दिवसांकरितां तरी आपण सीतापुरला आलंच पाहिजे !" "परंतु जगन्नाथाचे यावेळों आत्मिक उन्नतिसंबंधाचे विचार बरेच प्रगल्भ झाले होते. संसाराच्या मायेचा परित्याग करण्यास तो समर्थ झाला होता नाना प्रकारें सुनेला उपदेश करून त्याने ह्या प्रसंगी संसारबधनांतून मुक्त होण्याचा दृढ निश्चय केला. पुढें गंगाप्रसाद भानुमति आणि काश नाथ यांनां घेऊन सीतापुरला गेला. बृद्ध जगन्नाथशास्त्रीहि तत्क्षणों काशीविश्वनाथाला नमस्कार करून एका बुद्ध श्रमणाबरोबर हिमालयात निघून गेला. यानंतर जगन्नाथाचें त्याच्या पुत्राला किंवा सुनेला केव्हांहि दर्शन झाले नाही. आमच्या कथानकाच्या काळीं जगन्नाथशास्त्रे ह्या पृथ्वीवर होता, अगर तो जिवन्मुक्त झाला होता, हेहि कोणाला ठाऊक नव्हतें. आपल्या वयाच्या व्याण्णवदाव्या वर्षी जगन्नाथशास्त्र्यानें संसारांतील मायेचा त्याग केला. इकडे गंगाप्रसाद सीतापुरला जाऊन आपल्या वडिलार्जित जमीनदारीची व्यवस्था पाहू लागला. सीतापुरला आल्यावर दोनतीन वेळ तो लखनौ येथे जाऊन नवावाला भेटला होता. सादत अल्ली कार्शीत असतांना गंगाप्रसादानें त्याला बऱ्याच वेळां पैशाचे सहाय्य केलें होतें. नबाबाने हे पूर्वीच उपकार स्मरून गंगाप्रसादाची जमीनदारी व जहागिरी दसपट वाढविली व त्याचा दर्जाहि वाढविला. असो. बरीच वर्षे गंगाप्रसादाने आपल्या जमीनदारीचा आणि वैभवाचा निर्विघ्नपणे उपभोग घेतला सीतापुर येथे आल्यावर त्याला तीन कन्यारत्नांचा लाभ झाला. त्याच्या वडील कन्येचें नांव नारायणकुमारी, मधलीचें नांव चांदकुमारी आणि सर्वोत धाकटीचें नांव मानकुमारी असें होतें. नारायणकुमारी अकरा वर्षांची होतांच सांतापूर येथील प्रसिद्ध ब्राह्मण जमीनदार महाराज दिग्विजयसिंह याच्याश मोठ्या समारंभानें तिचा विवाह झाला. पुढे दोन वर्षांनी दुसऱ्या एका तशाच