Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जगन्नाथशास्त्री. आणि खरे पाहू गेले असतां जगन्नाथशास्त्र्याकडे पुख्खा झोडण्यास जमणाऱ्या या साधुसंतांत सर्वच साधू असत असे नाहीं. केवळ पोट भरण्यासाठींच साधूचा वेष धारण करणारे भोंदूहि त्यांत अनेक असत. परंतु जगन्नाथशास्त्री अति धार्मिक होता. त्याच्याजवळ कोणीं याचना केल्यास तो कोणालाह विन्मुख करित नसे. आणि ह्या त्याच्या भलेपणाचा लाभ घेऊन बरेच स्वार्थसाधु भोंदू त्याला लुबाडित होते.. जगन्नाथाला ही गोष्ट म्हणजे कळत नव्हती, असे नव्हे; परंतु त्याचे अंतःकरण उदार असल्यामुळे खऱ्या साधूंचीहि तो सेवा करी, भोंदूला हिं संतुष्ट करी. परंतु रोजरोज पुत्राशीं वाद घालित बसणे त्याला प्रशस्त वाटेना, ह्मणून त्यानें संसारांतून मुक्त होऊन वानप्रस्थ आश्रम स्वीकारण्याचा विचार केला. भानुमतीला सास त्याचा हा विचार कळतांच तिनें रडून रडून एकच आकांत केला. आपल्या सुनेसाठींच जगन्नाथशास्त्री अद्याप काशीहून गेला नव्हता. तिची मर्जी मोडणे त्याला कठीण वाटत होते. याप्रमाणे कांहीं वर्षे गेली. इ० स० १७९७ त नबाब असफ-उद्-दौला मृत्यु पावला व त्याचा भाऊ सादत अली अयोध्येचा अधिपति झाला. सादत अल्ली हा बंदिवासांत असतां काशी येथें होता. या वेळीं गंगाप्रसादाचा सादत अल्लीशीं बराच स्नेहसबंध जुळून आला. सादत अल्लीने गंगाप्रसादाकडून वेळोवेळी बरेंच कर्जाईि घेतले होतें सांप्रत आपला मित्र सादत अल्ली गार्द वर बसल्यामुळे गंगाप्रसाद पुन: सीतापुर येथे सहपरिवार जाऊन रहाण्याविषयी पित्याला आग्रह करूं लागला. परंतु जगन्नाथशास्त्री कांहीं केल्या सीतापुरास जाण्यास संमत होईना. तां गंगाप्रसादास ह्मणाला "अयोध्येच्या प्रजेच्या दैवींचे हाल कधींहि टळावयाचं नहींत. म्लेंच्छ इंग्रज व्यापायांचा ज्या देशांत पाय पडला, त्या देशांतील लोकांचे स्वातंत्र्य, संपत्ति, नष्ट होणारच. लोकांचे हाल, अत्याचार, अन्नकट कर्धीहि दूर व्हावयाचे नाहीत ! " " "सादत अल्ली हा फार चांगल्या स्वभावाचा नबाब आहे. त्याच्या कारकिर्दीत प्रजेवर जुलुम व्हावाचा नाहीं. शिवाय, माझी त्याची फार मैत्री आहे. आपला भाग्यकाळ उदयास येईल. आपण पुनः स्वदेशीं जाऊ, " वगैरे प्रकारें पित्यास सांगून गंगाप्रसाद सीतापुरला जाण्याचा अगदर्दी हट्टच घेऊन बसला जगन्नायशारुयानें पुत्राला नाना प्रकारें समजावून पाहिले, परंतु त्यानें कांहीं आपला हेवा ह्मणून सोडला नाहीं. पत्नीला घेऊन सीतापुर येथे जाण्याची त्यानें तयारी देखील केली काशींत असतां गंगाप्रसादाला एक मुलगा झाला होता. सांप्रत तो दोन वर्षांचा झाला होता.