Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ही रामाची अयोध्या ! बहुत तरी वेळ त्याला जमीनदारी, देवघेव इत्यादि प्रापंचिक विषयांत घालवावा लागे; परंतु काशीमध्ये त्याला साधुसमागम आणि ब्रह्मचिंतनपर ग्रंथांचं पर्यालोचन यांशिवाय दुसरे के णतेच काम नव्हते. सीतापुरहून त्यानें बरीच संपति आणली होती, व तिचा तो सढळ हातानें परोपकाराची आणि लोककल्याणाची कामे करण्याकडे उपयोग करित असे. जगन्नाथाचें घर साधु, बैरागी वगैरे लोकानीं सदासर्वदा भरलेले असे. आपली एकुलती एक सद्गुणी सून भानुमति इच्यावर जगन्नाथशास्त्री अत्यंत प्रेम करी. भानुमतीहि आपल्या पूज्य सासऱ्याची व तो नेहमी आपल्या घरीं मोठ्या भक्तीनें घेऊन येत असलेल्या साधुसंतांची शरीराला कवून जीवापाड सेवाशुश्रूषा करित असे कितीहि श्रम पडोत, कसेहि कष्ट होवोत, भानुनतीचें मुख नेहमी प्रफुल्ल असावयाचें सासऱ्यासाठी कष्ट सोसण्यांत तिला एक प्रकारचें सुखच वाटत असे. तिचे कोणतेंहि काम पाहिले तरी त्यांत तिचा आत्मत्याग आणि दुसऱ्याला सुख देण्याविषयों जीवापाड प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत असत. आपल्या स्वतःच्या सुलाकडे, कपड्यालत्त्यांकडे, एवढेच नव्हे तर खाण्या- पिण्याकडेसुद्धां तिचें लक्ष्य नसे. सासऱ्याची सेवाशुश्रूषा करण्यांत आणि अतीत- अभ्यागतांचा परामर्ष घेण्यांत आपल्या हातून यत्किचितहि कपूर होऊं नये, या एका गोष्टीचाच काय तो तिला रात्रंदिवस ध्यास लागलेला असे आपल्या सुनेचें हैं आचरण पाहून जगन्नाथशायाला परम संतोष वाटे. परंतु त्याचा पुत्र गंगाप्रसाद याला आपल्या वडिलांस लागलेला हा साधुसंतांचा नाद फारसा आवडत नव्हता. केव्हांकेन्हां बापलेकांत या बाबतीत खडाजंगी उडत असे. भानुमतीला M या साधुसंतांच्या आहारादिकांची व्यवस्था करण्यांत अतिशय कष्ट होत. सायंकाल होईपर्यंत केव्हां 'कव्हां तिला बिचारीला पळीभर पाणी पिण्याला देखील अवसर सांपडत नसे; व हें जरी ती अंतःकरणापासून आणि मुळींच न कुरकुरतां करी, तथापि गंगाप्रसादाला है रुचत नसे. पत्नीलाहि तो या बाबतीत रागें भरे व वडिलांनांहि दोष देई. गंगाप्रसाद एरव्ही फारच चांगल्या वर्तनाचा होता. त्याच्या चरित्रांत कसलाच दोष नव्हता; परंतु साधुसंतांविषयीं त्याचे चांगलेसें मत मदतें व त्यांच्याविषयीं त्याच्या मनांत आदरहि नव्हता. एक दिवस वडिलांस त्याने स्पष्टपणे सांगितले की " आपण ह्या ढोंगी भोंदू लोकांस घरदार लुटून देत आहां, है ठीक नव्हे. मला हें मुळींच पसंत नाहीं! "