ही रामाची अयोध्या ! कुमारी सविस्तर वर्तमान तो तुला सांगेल, परंतु काशीनाथाबद्दल मात्र व्यप्र होऊं नकोस !' असे म्हणून ती देवता तत्क्षण अंतर्धान पावली. ताई, काथ आश्चर्यै सांगू ! त्याच दिवशी संध्याकाळी अयोध्यानाथ माघारा आला. त्यानं आणिलेल्या बातमीवरून कळलं की, मानकुमारी दरवडेखोरांच्या हाती लागली नसून राजा दर्शनसिंहाचे लोक तिला पंजाबांत घेऊन गले आहेत. " पहिली स्त्री मध्येच ह्मणाली " नबाबाच्या लोकांनीच मानकुमारीला नेलं असावं, असं मला पाहिल्यापासूनच वाटत होतं. दरवडेखोरलोकांनां दागदागिने, पैसा संपत्ति सोडून केवळ तिलाच नेऊन काय लाभ आहे ? पण दादा अद्याप जिवंत आहे ह्मणतेस ? "" 66 मला वाटतं, दादा आत्महत्या करूं शकला नसावा. ज्या देवतेनं नदींतून मला वांचविलं, तिनच दादाचंहि रक्षण केलं असावं. " " मग बाबांनां तूं ही गोष्ट अझून कां नाहीं सांगितलीस ? "> " ह्या साच्या आश्चर्यकारक गोष्टतिलि रहस्य मलाच बरोबर कळलेलं नाहीं, मग भी बागंनां तरी काय सांगू ? " L " अयोध्यानाथाच्या कानांवर ही गोष्ट घालावी. त्याला सर्व शास्त्रं अवगत आहे. गूढ कदाचित् त्याला उकलतां आलं तर येईल. यांतील " 66 हळू बोल, बाबा जागे झाले वाटतं. " , पहिल्या स्त्रीच्या मुखांतून ' अयोध्यानाथ ' हा शब्द निघतो न निघतों इतक्यांत पलंगावर निजलला वृद्ध पुरुष जागा झाला. अयोध्यानाथाचें नांव ऐकतांच त्याने विचारले " आला का अयोध्यानाथ ? काय खबर घेऊन आला ? " त्या वृद्ध पुरुषाच्या तोंडचें ते शब्द ऐकतांच पहिली स्त्री एकदम उठून पलंगा- जवळ गेली व रोग्याच्या शेजारी बसून हलक्याच हातांनीं त्याचे पाय दाबित झणाली "नाहीं बाबा, अयोध्यानाथ अझून आला नाहीं. " हे ऐकतां व ह्यातायानें एक दीर्घ श्वास टाकला व तो स्वस्थ पडला.
पान:ही रामाची अयोध्या.pdf/६१
Appearance