सीतापुरचा किल्ला. " माझ्या केसालाहि शत्रु धक्का लावूं शकणार नाहीं! मी सुरक्षितपणं परत येईन. स्वप्नांत दर्शन देणाऱ्या देवतच्या वचनावर माझा भरंवसा आहे." " पण मला तर बाई मोठं भय वाटतं. तूं गडे अशी ही आगीत उडी घे नकोस ! " "तूं कसलीच भीति बाळगूं नकोस. देवतेचं वचन केव्हांहि मिथ्या व्हायचं नाही!" तुझी बुद्धि ठिकाणावर नाहीं हेच खास! स्वप्नांत तुला कांहीतरी भास होत... असेल, अन् त्याला तूं देवता समजत असशील. ताई, ही जर खरोखरच देवता असती, अन् आमच्या कल्याणाची तिला एवढी कळकळ असती, तर तिनं मानकुमारीच रक्षण कसं बरं केलं नाहीं ? " 66
- शत्रूच्या घरी मानकुमारी निर्भय आहे !"
66 उगाच तुला ही भ्रांति आहे ! आपल्या पातिव्रत्याचं रक्षण करतांना खात्रीनं मानकुमारीनं आत्महत्या केली असेल ! " यावर दुसरी स्त्री म्हणाली " मानकुमारीनं आत्महत्या केली नाही. ती सुरक्षित आहे. मानकुमारीच्या शोकानं मी अत्यंत व्याकुळ होऊन सीतारामाच्या मंदिरांत निराहारानं पडल्यें होत्यें. सीतापत ला करुणा येऊन त्यानं जर माझी मानकुमारी मला पुनः आणून दिली नाही, तर त्याच्या चरणांवर मस्तक आपटून प्राणत्याग करण्याचा मी अगदी कृतसंकल्प केला होता. मृत मनुष्यांचा शोक थोडाबहूत सहन करवतो, परंतु जीवंत माणसांचा शोक मनुष्याच्यानं मुळींच सहन करवत नाहीं! सतत तीन दिवस आणि तीन रात्री मी सीतारामाच्या मंदिरांत निराहारानं पडल्यें होत्यें. चौथ्या दिवशीं ह्या देवतेनं मला दर्शन देऊन किचित् कठोर स्वरानं झटलं 'नारायणकुमारी | तूं असा त्रागा कां करतेस ? मानकुमारी निर्भय आहे. तिच्या कैसासहि धक्का न लागतां ती सिंहाच्या गुहेतून, वाघाच्या जबड्यांतून सुरक्षितपणे परत येईल! पुण्यवती सती जनकदुहिता सीतादेवीनें राक्षसकुलाचा नाश करण्या साठीं अवतार घेतला होता; तशीच अयोध्येतील मुसलमान लोचें राज्य नष्ट करण्यासाठींच मानकुमारी जन्मास आली आहे. ' परंतु ह्या सांगण्यानं माझ्या मनाची शांति झाली नाहीं. मी त्या देवतेचे चरण घट्ट धरून म्हटलं ' देव | आपण खरोखरच सीतापति आहां. आपण सर्वांतर्यामी आहां. माझी मानकुमारी कुठं आणि कशा स्थितीत आहे हे कृपा करून मला सांगा.' माझ्या या विनंतीनं देवता कपाळास आंठ्या चढवून म्हणाली ' आज अयोध्यानाथ इकडे येईल. मान-