ही रामाची अयोध्या ! " मीहि पहिल्यानं त्या देवतेला आईच समजत होत्यें; परंतु ह्या देवतेचा वेष स्त्रीचा नसून पुरुषाचा असल्यामुळे माझी ती शंका पुढं नाहींशी झाली. " " तर मग हा तुला कांहीं तरी भास होत असेल ! आई अपती, तर मीं खरं मानलं असतं. आपल्या सच्चरित्र आईला सारे लोक कलियुगांतली सीता समजत असत. परलोकी गेल्यावर खात्रीनं ती देवपदास पोचली असेल. आपल्या संतानांच दुःख पाहून संकट समयीं धावून येत असेल, असं मला वाटलं होतं. " ती आई तर नव्हेच ! " तरमग कोण ? तुझा पति की काय ! " ८" नव्हे ! तिकडची मूर्तिहि खास नव्हे ! ते जर असते, तर मीं केव्हांचे ओळखलं असतं. तिकडच्या पायाचं नुसतं नख पाहूनसुद्धां माँ तिकडे तेव्हांच ओळखलं असतं !” "मग तुला नदीच्या पात्रांतून उचलून या महालांत कुणी आणून ठेविलं ? " " यांतील काहींच रहस्य मला कळत नाही. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, प्रत्येक सेकटाच प्रसंगी ही देवता मला दर्शन देते. " " "" मग तुला मी एक युक्ति सांगत्यें, तूं असं कर. सीतारामाच्या मंदिरांत चाऊन धरणं घेऊन बैस. जितके दिवस ही देवता आपली ओळख देणार नाहीं, तितके दिवस तूं मंदिगंत रामाच्या पायापाशीं उपाशीं पडून रहा. ओळख देई- सूर्यंत तिथून उठू नकोस ! " “हें तूं का मला शिकविलं पाहिजेस? मी तसं धरणं धरून बसल्येंहि होयें, परंतु त्याचा उपयोग झाला नाहीं कांहीं तरी तसंच भयंकर संकट उपस्थित झालं तरच ही देवता दर्शन देते. अन्य प्रसंग कितीहि प्रयत्न केले तरी त्याचा कांहींच उपयोग होत नाहीं. दर्शन घडत नाही. " " असंच जर खरोखरी असेल, तर मग हा निःसंशय तुझ्या बुद्धीचा भ्रम आहे!. काहीं झालं तरी तुला मी सैन्य घेऊन विजयगज इथ जाऊं देणार देणार नाहीं ! " “ मी तर जाणारच! माझा निश्चय प्राणांतीहि ढळायचा नाहीं ! " " बाबाला है तुझं करणं रुचेल का ? " " बाबांला हे मुळ कळवूच नये, ह्मणजे झालं. " " बरं, बाबांला नाही कळविलं, पण समज, तूं शत्रूच्या हातीं सांपडलीस तर मग इकडे बाबांची काय अवस्था होईल ? "
पान:ही रामाची अयोध्या.pdf/५९
Appearance