Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राठा घसंग्र सीतापुरचा किल्ला by महाले समोर येऊन उभी राहिली. माझ्या पाठीवरून हात फिरवित आश्वासनाच्या शब्दांनी ती मला ह्मणाली 'बेटा भिऊं नको ! 'प्रभु रामचंद्र या संकटांतून तुझी मुक्तता करील. उद्यां सायंकाली इंग्रजांचें सैन्य विजयगंज येथे येईल. यासाठी तू आपल्या सैन्यासह स्वतः तेथे जा व इंग्रजांच्या सैन्याला अडवून धर. तुझे लोक पलायन करूं लागतील, तेव्हां त्यांना उत्तरेकडे पळण्यास सांग. ' qu पहिली स्त्री साश्चर्याने वरील हकीगत ऐकत होती. परंतु आपली बहीण सैन्य घेऊन स्वतः समरांगणावर जाणार आहे हे तिच्या तोंडचे शब्द कानी पडतांच ती भयचकित होऊन मध्येच म्हणाली " ताई, मग तूं स्वतः सैन्य घेऊन जाणार? तें कधींहि व्हायचं नाहीं ! कांहींहि झालं तरी तुला मी तिकडे केव्हांहि जाऊं द्यायची नाही. त्या मुसलमान, फिरंगी दुष्ट राक्षसांच्या तावडीत तूं सांपडलीस तर ते चांडाळ तुझी कोण विटंचना करतील ? त्या अधमांपासून तुला अब्रूचं रक्षण करता येणं शक्य तरी का ? " यावर दुसरी स्त्री गंभीर स्वरानें म्हणाली " कांहीं होवो, मी स्वतः सैन्य घेऊन जाणार ! देवतेची आज्ञा कर्धीहि उलंघन करणार नाहीं ! " 4. पहिली स्त्री म्हणाली " तूं जी स्वप्नांत तुला कुणी देवता दर्शन देत असते म्हणतेस, तो तुझा निवळ भ्रम आहे ! अग, हे सारे स्वप्नांतले चाळे आहेत. आपल्याला तसा भ्रम होतो खरा, परंतु त्यांत कांही अर्थ नाहीं !". " पहिल्या पहिल्यानं मलाहि असंच वाटत होतं. परंतु आतां माझी खात्री होऊन चुकली आहे की, संकटांतून उद्धार करण्याकरितां कुणीतरी देवता मला दर्शन देते! मला वाटतं, परलोक गेलेला कुणीतरी आपला शुभेच्छु महात्मा देवतेच्या पदास पोहोंचला असेल व तोच दया करून आम्हांला संकटांतून सोडविण्यासाठी धावून येतो. तसं जर नसतं, तर सांप्रत चोर, दरवडेखोर, ठग, पुंड यांनी एकीकडे हाहाकार उडविला आहे, तर दुसरीकडे खुद्द बादशहा रयतेवर घोर अत्याचार करित आहे, अशा या भयंकर आपत्तीच्या दिवसांत आपणा अनाथांचं रक्षण कसं झालं असतं ? त्या देवतेवांचून आमचं रक्षण दुसऱ्या कुणीं केलं असतं का ? अशा या अनर्थामधें आपण घटकाभर तरी का सुरक्षित राहिलो असतों ? " पहिली स्त्री म्हणाली " होय, तूं म्हणतेस तेंहि खोटं नव्हे. जर खरोखरच कुणी परलोकवासी देवता तुला स्वप्नांत दर्शन देत असेल तर खचित ती आपली परमपूज्य माताच असली पाहिजे! आईवांचून एवढा स्नेह कोण करणार आहे ? आईची तुझ्यावर फार प्रीति होती; तीच तुला भेटत असेल ! "