ही रामाची अयोध्या ! 66 ( पहिल्या स्त्रीचा अतिशयच आग्रह पाहून दुसरी स्त्री ह्मणालीं तर मग सांगत्यें, ऐक. तिकडून देवलोक मेल्या दिवसापासून वारंवार मी एक अद्भुत चमत्कार या महालांत पहात आहे ह्या अद्भुत गोष्टींतील गूढ काय आहे हे मला अद्यापि समजले नाही, तथापि ती गोष्ट घडत असते हैं मात्र खर आहे. तिकडे युद्धांत पडल्याचं भयंकर वर्तमान ऐकतांच मी शेकानं अगदी विव्हल झाल्यें होत्यें, तिकडच्या स्वारीबरोबर सहगमन करून आपल्या दुःखाचा अंत करावा असा. मी मनाचा निर्धार केला होता; परंतु काय आश्चर्य सांगाव! अकस्मात् कुणी देवता माझ्यासमीप उभी राहिली व मी माझा तो विचार रहित करावा ह्मणून नाना प्रकारं मला बांधाच्या गोष्टी सांगू लागली. ती देवता शेवटी मला ह्मणाली ' दुसऱ्यांकरतां राहो, परंतु तुझ्या पित्यासाठी तरी तूं देहत्याग करूं नकोस ! तू सती गेल्यास तुझ्या पित्याची दुर्दशा होईल. त्या देवतेची आज्ञा उल्लंघन करण्यास मी अगदी असमर्थ झाल्यं. पुढं दोन वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला. बादशहाचं सैन्य रयतेला पीडण्यासाठी या बाजूस आलं होतं. त्या काळपुरुषांच्या असह्य छळास भिऊन आमचे लोक पळून गेले. बचण्याचा दुसरा कांहींच उपाय राहिला नसल्यामुळे मी त्यावेळी धर्मरक्षणासाठी भागीरथत उडी घेतली; परंतु बेशुद्ध स्थितीत मला इथं कुर्णी पुनः आणून ठेविलं ते ही घटकापर्यंत मला ठाऊक नाहीं ! शुद्धीत आल्यावर मला कळून आलं की, मी महालांतील आपल्या खोलीत निजल्यें आहे. महालांतील एकून एकास मी खोदखोदून विचारलं की, भीं नदीत उडी घेतली होती, तिथून उचलून मला इथं कुणी आणलं? परंतु कुणाकडूनहि याबाबतीत कांहींच सुगावा लागला नाही. यानंतर नाना प्रसंगांचे वेळीं जेव्हां जेव्हां मीं अगदर्दी हतबुद्ध होत असें व संकट निवारण्याचा कांहींच मार्ग न सुचल्यामुळं चिंताव्याकुळ होऊन माझं मन अगदी अस्वस्थ होत असे. त्या त्या वेळी माझा किंचित् डोळा लागतांच तीच देवता मला दर्शन देई व उद्धाराचा मार्ग सुचवी. त्या देवतेच्या सदुपदेशानंच आजवर सर्व विपत्तीतून मुक्तता करून घेण्यास मी समर्थ झाल्यें आहे. आजहि आपल्यावर तसाच घार प्रलंग- आल्यामुळे माझं मन अगदी अस्वस्थ झालं होतं. सकाळपासून मला भूकतहान सुचत नव्हती. स्नान करून मी सांतारामाच्या मंदिरांत रामनामाचा जप करित बसल्यें होयें. पोटांत पळीभरहि पाणी गेलं नसल्यामुळं जप करतां करतां माझा किचित् डोळा लागला. लगेच ती देवता माझ्या
पान:ही रामाची अयोध्या.pdf/५७
Appearance