सीतापुरचा किल्ला. ५९ असं का तुला वाटतं ? तूं मुळींच काळजी करूं नकोस! संकटसमय तोच आमच्या सहाय्यास धावून येईल व योग्य मार्ग दाखवील ! ” दुसऱ्या स्त्रीचें हें धैर्याचें भाषण ऐकून पहिली स्त्री नंतर कांहीं बोलली नाही. तथापि तिच्या त्या वेळच्या मुद्रेवरून तिची चिंता दूर झाल्याचे दिसत नव्हते. जणूं काय त्रासित, भीत चित्तानें ती मनांतून ईश्वराचा धांवा करित आहे, असे दिसलें. दुसरी स्त्री पुढे ह्मणाली " माझं मन तर मला स्पष्ट सांगत आहे कीं, ह्या जुलमी लोकांपासून खात्रीनं आपण बाबांचं रक्षण करण्यास समर्थ हो ऊं; त्याबद्दल तू मुळींच चिंता करूं नको ! बाबा जर पूर्वीच इकडे येण्याला कबूल झाले असते, तर मानकुमारीची अशी दशा मुळीच होतीना! महाराजांच्या मृत्युकालीं माझा सती जाण्याचा अगदी निर्धार झाला होता. केवळ बाबांच्यासाठी मी जगल्यें. तुं परमे- श्वराचं एकनिष्ठेनं स्मरण कर, या संकटांतून खात्रीनं तो आपलं रक्षण करील !" " परमेश्वर. शिवाय आतां आह्मांला कुणाचा आसरा आहे ? तरीहि संकटाच्या निवारणाचा जो कांहीं उपाय योजावयाचा तो अगोदरच योजून ठेवणं चांगलं. कारण, आयत्यावेळी मन भांबावून जातं. " यावर दुसरी स्त्री किंचित् हंसून ह्मणाली " कसंहि संकट आलं तरी मी त्यावेळीं भांबावून जाणार नाहीं ! " परंतु हे हास्य पहिल्या स्त्रीला रुचलें नाहीं. ती किंचित् विरक्त स्वराने ह्मणाली " ताई, ही विनोदाची का वेळ आहे ? समोर शत्रु येऊन उभा आहे अन् अशा प्रसंगीहि तुला हास्य सुचतं ? "> दुसरी स्त्री ह्मणाली " मी विनोद करित नाहीं नी हंसत पण नाहीं. खरोखरच सांगत्यें, संकटाचे वेळी मी मुळींच डगमगायची नाहीं ! " " ट्झं आपलं काहींच्या बांहींच हें बोलणं ! संकटाच्या वेळीं मनुष्याची बुद्धि कधींहि स्थिर रहाणार नाहीं ! " " कांहींच्या बांहीं मी आजपर्यंत केव्हांहि बोलल्ये नाहीं व पुढंहि बोलगार नाहीं! माझी ती अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे खरी, ती सांगितल्यावर तुला खरीसुद्वां वाटणार नाही. माझ्या सांगण्यावर कदाचित् तुझा विश्वासहि बसणार नाही - “ पण काय ते सांग तर खरी ! 22 " तें ऐकून तू काय करणार? " “ ऐकून जिवाला अमळ धीर तरी वाटेल. "
पान:ही रामाची अयोध्या.pdf/५६
Appearance