सीतापुरचा किल्ला. 50 - गजबजलेली असे. ह्या पागेपासून पश्चिमेच्या बाजूस काही अंतरावर एक मोठी हवेली होती तींत एका भागांत महाराज दिग्विजयसिंहाची कचेरी असून दुसन्या भागांत जुनीं दप्तरे ठेविली होती व तिसऱ्यांत बॉडीगार्ड व महाराजांचे दुसरे खास नोकरचाकर रहात असत त्या हवेल च्या पश्चिमेस आणखी तिसरी एक हवेली होती व तीत नाटक.गृहाची योजना केली होती. ह्या हवेलींत पश्चिमभागांत महाराजांचा दिवाणखाना व दरबार हाल असून उत्तरेच्या बाजूच्या एका भव्य दिवाण- खान्यांत अनेक पुतळे व मूर्ति मांडल्या होत्या. बाकीच्या भागांत राजमंदिरांतील दासदासी रहात असत. ह्या तिसऱ्या हॅवलीच्या मागच्या बाजूस उंच दगडी तटानें वेष्टित असा एक रमणीय बगीचा होता. बगीच्याचा मधोमध पूर्वपश्चिमा- भिमुख एक रस्ता असून हा रस्ता वर सांगितलेल्या तिसऱ्या हवेलीच्या आणि राजमहालाच्या सिंहद्वारांच्या समोरासमोर होता. राजमहालाच्या मध्यभाग प्रशस्त मोकळी जागा सोडून त्याच्या चान्ही बाजूंला तिमजली सुंदर हवेल्या बांधल्या होत्या. सांप्रत ह्या राजमहालाची शोभा नष्ट झाली होती. पूर्वीचें वैभव, पूर्वीचा उत्साई, पूर्वीची प्रफुटता सांप्रत दृग्गोचर होत नव्हती. संपूर्ण राजमहालावर उदासी- मतेची छाया पसरली होती. आपल्या सध्याच्या मालकाप्रमाणेच या राजमहालानेंहि शोकचिन्हें परिधान केलेली दिसत होती महालाच्या डागदुजीकडे कोणाचें लक्ष्य नव्हतें. मोठमोठे दिवाणखाने अंधकाराने व धुळीने माखले होते. कोठें कोठें तर भिंतीवर रानहि उगवलें होतें. तात्पर्य, पूर्वी जे स्थान हास्य उल्हासाचे निवासस्थान असे त्यानेंच आज स्मशानासारखें भयाण रूप धारण केले होतें. इ. स. १८३१ च्या सुरुवातीस एके दिवशी काळोख्या रात्रीं, ह्या राज- महालांतील पश्चिमभागच्या भव्य हवेलींत दोघी विधवा स्त्रिया अगदी मंद स्वरांत परस्परांशीं कांहीं बोलत एका व्याघ्रचर्मावर बसल्या होत्या. जवळच एक पलंग होता, त्याच्यावर रोगान जर्जर झालेला व ज्याच्या शरीरांतील एकून- एक अस्थि मोजतां येत होत्या असा एक वृद्ध पुरुष निजला होता. वरील दोघी स्त्रिया जवळजवळ सारख्या उमरांच्या असून त्यांचा तोंडवळाहि एक- सारखाच होता. त्यांच्या गोष्टी पुष्कळ वेळपर्यंत चालल्या होत्या बोलतां बोलता . एकजण ह्मणाली " ताई, इंग्रजांच्या लष्करांनं उद्यां किल्यावर हल्ला केल्यास बाबांची काय बरं अवस्था होईल ? त्यांच्यानं तर मुळीच हालवत चालवत नाही. आपण
पान:ही रामाची अयोध्या.pdf/५४
Appearance