Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दोघे मुख्य प्रधान 26 तर मग दरबारचा अपमान करण्याचा यांचा उद्देश नसतो, हे उघड आहे. तुम्ही जोडे काढून ठेवून दरबारला मान देतां, इंग्रज लोक टोपी काढून सन्मान प्रदर्शित करतात. तुम्ही जर पगडी काढून दरबारांत याल तर तुम्हांलाहि मी जोडयांसह दरबारांत येण्याची परवानगी देईन. " मुसलमानांला पगडी उतरणें हा प्राणांतिक अपमान वाटत असतो. अर्थात् मेहद अल्लीची सर्व चतुरता निष्फल झाली. त्याला वाटत होतें कीं, इंग्रज लोकांनां जोडे उतरून दरबारांत येण्याचे फर्मावितांच ते अपमानित होऊन आपोआप चालते होतील, अर्थात् आपला मनोदय यत्किंचितहि प्रयास न पडतां सहजासहजी सिद्ध होईल परंतु बिचान्याचा तो प्रयत्न विफल झाला. मेहदअल्ली नंतर दुसऱ्या उद्योगाला लागला. बादशहाची मर्जी आपल्यावर कशी प्रसन्न होईल हाच त्याला रात्रंदिवस निदिध्यास लागला होता. चैनी बादशहाला पैशांची फार गरज होती व त्याला आपण मुबलक पुरविले जे तो आपल्यावर प्रसन्न होईल, असा विचार करून मेहदअल्ली पैसे जमविण्याच्या • प्रयत्नास लागला; परंतु या वेळीं बहुतेक जहागिरदार, जमीनदार उघड उघड़ सरकाराविरुद्ध उठले होते, जागजागी बंडाचे झेंडे फडकूं लागले होते. परंतु मेहद अल्ली कांहीं कच्चा नव्हता. त्याने इंग्रजी सैन्याची कुमक घेऊन इंग्रजांची एकेक फलटण प्रत्येक तालुकदाराच्या सहाय्यास पाठवून दिली व त्या सैन्याच्या जागवर रयतेकडून पैसा पिळून काढण्यास त्यानें तालुकदारांस फर्माविलें. पुनः अयोध्यमध्ये अत्याचाराचा वडवानल भडकून गेला. त्या ज्वालांनीं होरपळून पुनः सहस्रावधि ●असहाय अबला आपल्या शिशृंततानांस उराशी घेऊन भारतमाता सुरधुनी गंगेच्या शीतल आश्रयास गेल्या. आपली पत्नी, भगिनी, वृद्ध जननी यांनां गंगेच्या हवाली करून अयोध्येच्या सदाचारी परंतु असहाय दुर्बक प्रजेमधील शेंकडोजण आपल्यावरील अत्याचाराचा सूड उगविण्याच्या हेतुनें चोर, ठग, दरवडेखारे यांच्या टोळ्यांत सामील झाले व सर्वत्र जाळपोळ करूं लागले. कित्येक बिचार सात्त्विक वृत्तीचे लोक होते त्यांनी संसारसुखावर जलांजलि वाहून वानप्रस्थाश्रम स्वीकारून हिमालयाचा आश्रय केला.