१५४ ही रामाची अयोध्या ! • मेहद अल्ली विशेषच लीनतेनें म्हणाला " गुलामाला बेअदबीची माफी असल्यास हुजुरांच्या कानांवर एक गोष्ट घालण्याची परवानगी घेईन.” "बोला काय तें. " मेहद अल्ली दोन्ही हात जोडून म्हणाला cl मुलके जामानिया ! बादशाही " दरबारचा एक जुना रिवाज नाबुद होत आहे. " कोणता रिवाज नाबुद होत आहे ! कुराणांत चार बेगमा करण्यास सांगितलें असल्यास मी आठ बेगमा करण्यास एका पायावर तयार आहे !" " खुदावंत ! बादशहानें आठ कां अट्ठावीस बेगमा केल्यास कुराणाची त्याला संमतीच आहे. मी जें म्हणत होतों तें त्या बाबतींत नव्हे. “ मग कोणत्या बाबतीत, ते लवकर सांगा पाहूं ? " 66 'हुजुर ! पायांत जोडा घालून अयोध्यच्या दरबारांत येण्याचा प्रघात केव्हांहि नव्हता. मुलके जामानियाचे परम वंदनीय वडील, पुरुषसिंह-पृथ्वीचे सार्वभौम राजे - अयोध्येचे पराक्रमी, नीति-न्याय-परायण, बादशहा गाझी-उद्-दिन- हैदर केव्हांहि जोडे घालून आपल्या दरबारांत कोणालाहि येऊं देत नसत ! तथापि खुदावंतांच्या दरबारांत फिरंगी लोक सर्वदा जोड्यांसह निःशंकपणें प्रवेश करित आहेत ! ” 66 नासीर किंचित् हंसून म्हणाला " इंग्लंडचा राजा मोठा की मी मोठा, सांगा पाहूं?" मुलके जामानिया, हिंदुस्थानांतील सर्व राजांपेक्षां - दिल्लीच्या बादशहापेक्षांहि थोर आहेत! " " काय म्हटलेत ? मी इंग्लंडच्या राजापेक्षांहि श्रेष्ठ ! " “ मुलके जामानिया ! गुलाम का आपल्या प्रभूपक्षां दुसऱ्या कोणाला श्रेष्ठ म्हणूं शकेल ? किंवा दुसरा आपल्या धन्याहून श्रेष्ठ आहे असे त्याच्या मनांत तरी कसें येईल ? " “ वज़ीर ! ऐका. इंग्लंडचा राजा हा माझा मालक आहे. त्याच्या दरारांत जर हे इंग्रज लोक बुटांसह प्रवेश करितात, तर मग मी जो त्या इंग्लंडच्या राजाच्या ताबदार त्या माझ्या दरबारांत हे जोडा पेहरून आल्यास त्यांत काय बिघडलं ? हे केव्हांहि मस्तकावर टोपी ठेवून माझ्या दरबारांत येत नाहींत ! " 6 'होय खुदावंद ! टोपी उतरून नंतर हे येत असतात.
पान:ही रामाची अयोध्या.pdf/५१
Appearance