Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दोघे मुख्य प्रधान. ५३ संपत्तीवर होती; दर्शनसिंहाचें शस्त्र त्याचें तोंड होतें, सर्फराजखांचें शस्त्र त्याचा वस्तरा आणि कातरी होतें; बाहेरच्या लोकांवर दर्शनसिंह आपला अधिकार गाजवित असे, सर्फराजखांच्या हुकुमाशिवाय जनानखान्यांत पानहि हलत नसे; बादशहासाठीं राज्यांतील सुंदर स्त्रिया संग्रह करित असतां दर्शनसिंह त्यांतील विशेष रूपवान् स्त्रिया बादशहाच्या हातावर तुरी देऊन कधींकधीं मधल्यामध्ये आपणच बळकावून बसे, तर इकडे सर्फराजखां विशेष स्वार्थत्याग प्रगढ करित असे; इतका कीं, आपल्या परिवारांतील स्त्रियांवर बादशहाची नजर गेल्यास त्यांची बादशहाच्या झनान्यांत भरती करण्यासहि तो मार्गेपुढे पहात नसे! हकीम मेहद अल्लीखां केव्हां केव्हां सर्फराजखांशी अत्यंत मित्रत्त्व दर्शवून त्याच्या गुप्त कारस्थानांत सामील होऊन राजा दर्शनसिंहाच्या नाशाचे प्रयत्न करी, तरकेव्हां केव्हां दर्शनसिंहाश स्नेहभाव दर्शवून सर्फराजखांला पदभ्रष्ट करण्याच्या त्याच्या प्रयत्नाला मनापासून सहाय्य करी. नासिरुद्दीनाचे दुसरे चार युरोपियन् सवंगडी असत, त्यांनांहि सर्फराजखांचें हें वर्चस्व सहन होत नव्हते. बादशहाची त्याच्यावर इतराजी होईल असे प्रयत्न करण्यांत त्यांचेंहि आंतून अंग असे. सारांश, नासिरुद्दीनाच्या कारकिर्दीत त्याच्या राज्यांतील काय किंवा खास दरबारांतील काय, एकून एक अधिकारी बाहेरून परस्परांशी मैत्रीचें अघळपघळ प्रदर्शन करीत व आंतून जो तो दुसऱ्याच्या नाशाविषयीं टपून बसलेला असे. बादशहाला घेरणारें हैं आंग्ल पंचायतन हकीम मेहद अल्लीच्या डोळ्यांत एकसारखें सलत होते. त्या पांचहि बदमाषांस केव्हां हाकलून देऊं, याविषयीं त्याची सारखीं पाताळ यंत्रे चालू होती. परंतु या प्रयत्नानें आपल्यालाच प्रधानगिरीला मुकावे लागेल, हें बचाऱ्याला कळले नाहीं! आज मेहद् अल्ली बादशहाला राज्या- संबंधी काम समजावून दत होता. साहस करून ओघाओघानें त्यानें आपल्या मनांत रात्रंदिवस डवचत असलेल्या गोटीचा उपक्रम कला. तो ह्मणाला "मुलके जामानिया | नौसिरासारखे आपण न्यायपरायण, हातांमासारखे दानशूर, जगांत आपल्यासारखा दयाळू, धमोवतार, पराक्रमी बादशहा आजपर्यंत झाला नाहीं व मी खात्रीने सागतों की, पुढेहि होणार नाही! अल्ला आपल्याला सहस्र वर्षे आयुष्य देवों व आपली बादशाही चिरायु करो !" वजिराचें हे प्रशंसापर भाषण ऐकतांच नाशीर समजून चुकला की, स्वारीच्या मनांत आज कांहीतरी सांगावयाचें आहे हास्य मुख करून बादशहानें विचारलें “ वजीर, काय म्हणतां, बोला झटकन ! "