दोघे मुख्य प्रधान. प्रकरण ५ वै. दोघे मुख्य प्रधान. “ अजब आपकी बादशाही तमाम खलकतकी ताबानी, " ४९ सौभाग्याची चंचलता, अधिकार-वैभवादिकांची अनित्यता, त्याचप्रमाणे संसाराची असारता, ह्यांची प्रतीति अयोध्येच्या इतिहासांतील प्रत्येक घटना अयोध्येच्या हतभाग्य लोकांस क्षणोक्षणीं आणून देत होती. मागील प्रकरणांत सांगितलेल्या गोष्टी घडल्याला एकदोन महिने लोटण्यापूर्वीच अयोध्येचे मुख्य प्रधान नवाब मत - मुद-उल्- दौला आणि दिवाण राजा रामदयाळ सिंह है उभयतां कारागृहां- तौल भयंकर हालअपेष्टा अनुभवित होते. त्यांचे वाडे, हवेल्या, जमीनजुमला, सारी संपत्ति बादशहाच्या हुकुमाने जप्त झाली होती. फरक्काबादहून मन्ताजिम -उद्-दौला लखनौला येऊन प्रधानगिरीचे काम पाहू लागला होता. ह्यालाच इकीम मेहद अल्ली खां असें ह्मणत असत. अयोध्येचा इतिहास लिहिणारांचे म्हणणे आहे कीं, नबाब मत-मुद-उल-दौला आणि दिवाण राजा रामदयाळ यांनी सरकारी पैशाचा अपहार केल्याच्या आरोपा- वरून नासिरुद्दीनाने त्यांनां तुरुंगांत टाकिले होते; परंतु नबाबी अमलाच्या वेळीं अयोध्येतच काय, सान्या हिंदुस्थानांत सरकारचे लहानमोठे अधिकारी आपली तुंबडी भरण्यांत मोठे प्रवीण असल्याबद्दल त्या सर्वांची फार ख्याति आहे. म्हणून, केवळ वरील अपराधामुळेच बादशाहाची त्यांच्यावर इतराजी झाली, असें निदान आम्हांला तरी वाटत नाही. अयोध्येचा बादशहा नासिरुद्दीन हा फिरंगी हजाम सर्फराजखां ह्याच्या अगदीं ओंजळीनें पाणी पीत होता. या सर्फराजखांच्या कुशाग्र बुद्धीचा अल्प परिचय मागील प्रकरणांत वर्णिलेल्या त्याच्या संक्षिप्त चरित्रा- वरून वाचकांस झालाच आहे. ह्या नापित महाराजांनी बादशहाच्या झनान्यांतील खोजा मंडळीचा पूर्ण स्नेह संपादून त्यांच्या सहाय्यानें नासिरुद्दीनाच्या अंतःपुरांत आपले पूर्ण वर्चस्त्र स्थापित केले होते. ह्या न्हाव्याचा अंतःपुरांत प्रत्यक्षपणे जरी प्रवेश होत नव्हता, तरी तेथील सर्व सूत्रे हालविणारा हाच होता. नबाब मत-मुद-उल्-दौला आणि राजा रामदयाळ यांनां पदभ्रष्ट व्हावें लागून तुरुंग-
पान:ही रामाची अयोध्या.pdf/४६
Appearance