Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नापितराज सर्फराजखां. ४७ भाऊ ! त्याच्याकडे कानाडोळा करणे बादशहाला भाग पडलें. आपल्या आवडत्या बेगमेला पैसा न पोंचल्यामुळे तिला तेवढी रक्कम खजिन्यांतून देण्याचा प्रधनासा हुकूम झाला. इकडे याच संधीस सर्फराजखानें बादशहाच्या पशुशाळेत ठेवण्या- साठीं कांही जनावरें खरेदी केलीं, त्याबद्दल बरीच रक्कम देण्याविषयीं बादशहाचा हुकूम सुटला. मुख्य प्रधान आणि दिवाण आपापल्या नोकरीच्या रक्षणासाठी फार भिऊन गेले व त्यांनी एकंदर तालुकदारांस सक्तीचे हुकूम सोडून अमुक अमुक पैसा चैत्र महिना संपण्याच्यापूर्वी पाठविलाच पाहिजे, असे निक्षून कळविले. ज्यांच्याकडून वरील मुदतींत पैसा येण्यांत अंतर होईल, त्यांगं एकदम बडतर्फ केले जाईल, असेंहि त्यांनी सर्व तालुकदारांस बजाविलें होतें. काय करतात बिचारे, सगळे पोटाचे दास ! वरिष्ठांचा असा हुकूम येतांच त्यांच्यांत मनुष्यपणाचा जो कांहीं यत्किंचित् अंश होता तोहि नष्ट झाला व प्रत्येकानें राक्षसी स्वभाव धारण करून रयतेवर घोर अत्याचार आरंभिला. बरोबर लष्करी लोकांची तुकडी घेऊन एकेक तालुकदार आपापल्या प्रांतावर स्वारी कवयास निघाला ! गांवांची गांवें, शहरांची शहरें त्यांनी जाळूनपोळून बेचिराख केलीं, हजारों निरपराध्यांचे हाल हाल केले, हजारों लोकांनां राखेचे तोबरे चारिले, तुरुंगांत पाठविलें, कित्येकांचे प्राणहि घेतले! जेणेकरून पैसा उत्पन्न होईल असे कोणतेंहि घोर कर्म करण्यास त्या अधमांनी मार्गेपुढे पाहिलें नाहीं. त्यांनी श्रीमंत जमीनदारांच्या, सावकारांच्या घराला वेढा द्यावा, त्यांच्या बायकामुलांस पकडावें व अमुक अमुक रकम या म्हणजे तुमच्या बायकामुलांनां सोडतां, नाहींतर त्यांनां भ्रष्ट करतों अशी धमकी देण्याचा क्रम आरंभिला. अयोध्येच्या प्रजेमध्ये हिंदूंचा भरणा विशेष होता, आणि हिंदुलोकांना आपल्या बायकांची अब्रू म्हणजे प्राणापेक्षांहि प्रिय असते हैं सांगावयास नकोच. बिचारी असहाय, दुर्बल प्रजा घरांत होतें नव्हतें तेवढे त्या सरकारी अधिकारीरूपी मांगांच्या हवाली करून आपल्या स्त्रिया-भगिनी- मुलींची अब्रू बचावूं लागले. ज्या जमीनदारांपाशीं, जहागिरदरांपाशीं थोडेसे शिपाईप्यादे होते व ज्यांचीं घरें किल्यांप्रमाणे मजबूत होतीं ते या तालुकदारांवर उठून त्यांच्याशी लहूं लागले व कित्येकांस त्यांच्या पापाचें प्रायश्चित्त भोगण्यासाठी यमसदनास पाठवूं लागले. मोहामदी, सीतापुर वगैरे जिल्ह्यांत तर भयंकर बंडाळी सुरू झाली.