नापितराज सर्फराजखां. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांत एके दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास छोटी द्दजिरी उरकून बादशहाची स्वारी राजवाड्यांतील एका दिवाणखान्यांत एकटीच बसली होती. या वेळी बादशहाच्या आंग्ल पंचायतन दोस्तांपैकी चौघेजण छोटी हजिरी खाऊन घोड्यावर बसून रपेट करण्यासाठी शहरांत गेले होते. अकरा बाजेपर्यंत ते परत येणार नव्हते. अशी संधि साधून सर्फराजखां हातांत हिशोबाचा कागद घेऊन तेथें आला. त्याला पाहून नासिरुद्दीन हास्य मुद्रा करून ह्मणाला 'हां, खांसाहेब ! खर्चाचा हिशेब आणला वाटतें ? " 26 सर्फराजखां मस्तक लववून ह्मणाला " मुलके जामानिया ! हाटले, गेल्या महिन्याच्या खर्चाचा आंकडा खाविंदांच्या कानांवर घालावा. " सर्फराजखांचा शेव इंग्रजी दुकानदारांच्या बुकाप्रमाणें अगर देशी व्यापाऱ्यांच्या चोपडीप्रमाणे बुकांत अगर चोपडीत लिहिलेला नव्हता. जन्मपत्रिकेचा लांबच लांब गुंडाळी केलेला जसा कागद असतो, तशी एक भली मोठी गुंडाळी केलेल्या कागदावर त्यानें आपला हिशेब मांडला होता. • नासिरुद्दीनाने हिशेबाचें नांव काढतांच सर्फराजखांने गुंडाळचें एक शेवट हातांत धरून ती टेबलावर सर्कन् सोडून दिली. गडगडत गडगडत तिनें सारें टेबल च्यापिले, तरीहि शेवटचा भाग गुंडाळलेलाच राहिला होता! नासिरुद्दीन ही ही करित झणाला " मोज बर हिशेब किती गज लांब आहे तो ! " सर्फगजखांनें ताबडतोब फुट घेऊन कागद मोजला तों तो पांच यार्ड, दोन फूट, आणि साडेतीन इंच भरला. कांहीं गुंडाळी सुटावयाची राहिली होती ती उलगडून • सर्फराजखां मोजावयास जात होता, परंतु त्याचा हात धरून नासिरुद्दीन ह्मणाला बस, पुरे कर. एवढा मोठा हिशेब आणला आहेस? बरें, मला सांग एकंदर किती रुपये झालं ? " 66 -सर्फराजखां ह्मणाला " नव्वद हज़ार रुपये मुलके जामानिया! " be इतर महिन्यांपेक्षां बरीच जास्त रकम दिसते रे ! " “ मुलके जामानिया ! इतर महिन्यांपेक्षां गेल्या महिन्यांत थोडासा अधिक खर्च झाला आहे. काही नवीन चिनीमातीची भांडीं, दोन काबुलीं मांजरें व एक बुलडॉग विकत घेतला, त्यामुळे हा थोडासा खर्च वाढला आहे. बुलडॉग कसा आहे पण ! तुमच्या हिंदुस्थानांतील दोन हत्तींचा समाचार घेईल ! "
पान:ही रामाची अयोध्या.pdf/४२
Appearance