नापितराज सर्फराजखां. न्हावीबुवांवर रेसिडेंटची स्वारी खुष झाली. लगेच त्यांनी 'नासिरुद्दीनाकडे ह्या न्हाव्यासंबंधी प्रशंसा करून त्याने आपल्या न्हाव्यादाखल याची नेमणुक करावी अशी त्याला शिफारस केली. देशी राजेरजवाड्यांनां रेसिडेंटची शिफारस ह्मणजे गव्हर्नर- जनरलाच्या हुकुमापेक्षांहि जास्त असते! नासिरुदानानें तत्क्षणीं याला आपल्या तैनातीस ठेविलें. अल्प काळांतच हे नापितराज बादशहाचे दिलजान दोस्त बनले. बादशहा ह्या न्हाव्याबरोबर एका टेबलावर बसून आहार करूं लागला, आणखी काय राहिलें ! ह्या न्हाव्याचें नांव ऐकतांच कोणीहि याला हा कुलीन घराण्यांतला आहे असे मानित नसत. कारण, बापा ऐवजी हा आईच्या नांवानेंच प्रसिद्ध होता. अर्थात्, अशा हीन कुलोत्पन्नाबरोबर एका टेबलावर बसून भोजन करण्यास बादशहाचे दुसरे फिरंगी दोस्त वेळोवेळी आपली अनिच्छा प्रदर्शित करूं लागले. ही गोष्ट बादशहाच्या ध्यानीं येतांच ह्या भानगडीचा निकाल करण्यासाठी त्याने याला मुसलमान उमरावाची 'सर्फराजखां' अशी बहुमानाची पदवी देऊन उच्च पदास चढविलें. या प्रमाणे हा फिरंगी न्हावी मुसलमान उमरावाच्या पदवीस चढल्यामुळे आतां त्याला बादशहाबरोबर उघडपणे एकाच टेबलावर बसून स्वाग्यापिण्यास कसलीच हरकत राहिली नाहीं. दारूच्या निशेत हास्यविनोद करतांना हा केव्हा केव्हां नासिरुद्दीनाच्या चुलत्याची पगडी थट्टेनें उडवित असे ! मुसलमान लोकांना त्यांच्या पगडीस कोणी हात लाविला तर मोठी चीड वाटते. त्या अपमानाबद्दल ते अपमानकर्त्यांचा खून करण्यासहि मागेपुढे पहावयाचे नाहीत! परंतु हा फिरंगी व्हावी खुद्द बादशहाच्या चुलत्याची व दुसऱ्या बड्या बड्या मुसलमान उमरावांची अशा प्रकारची थट्टा - अपमान - हरहमेश करित असे. सारांश, रेसिडेंटाशिवाय साया अयोध्येतील लहानथोर व्यक्ति या न्हाव्याला थरथर कांपत असत. त्या वेळ तो करील ती पूर्वदिशा आणि बोलेल तें वेदवाक्य, अशी स्थिति होती. नासिरुद्दीनचा पिता गाझांउद्दीन हैदर याचा आचारविचार एखाद्या धर्मशीळ मुसलमानाप्रमाणे होता. तो कट्टा मुसलमान असल्यामुळे इंग्रजांच्या आचारा- विचारांचा अर्थातच तिरस्कार करी; परंतु त्याच्या चिरंजीवाची गोष्ट बापाच्या आचारविचारांच्या अगदीच विरुद्ध होती. आपले रीतिरिवाज सोडून देऊन प्रत्येक बाबतीत इंग्रजांच्या रीतिरिवाजाचें नासिरुद्दीनानें अनुकरण केले होतें. इंग्रजां प्रमाणे तो टेबलावर खातपीत होता व या टेबलखर्चाची व्यवस्था पहाण्याची कामगिरी त्याने आपला दिलजान दोस्त सर्फराजखां याच्यावर सोपविली होती.
पान:ही रामाची अयोध्या.pdf/४०
Appearance