Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ ही रामाची अयाध्या ! चौथा ह्यणाला " केवळ गोऱ्या कातडीला विलायतो मेम भाळत नसते बरें ! तिला पैसा लागतो पुष्कळसा पैसा ! " पांचवा ह्मणाला "मोठे तेवढे सारे खोटे ह्मणतात ते उगाच नव्हे ! ह्या नबाब, अमीर उमरावादि लोकांस कांहींच का कळत नाही ? ह्या जख्खड थेरडीवर नबाब साहेब एवढे कशाला भाळले आहेत अल्ला जाणे ! ” यार महमदाच्या दुकानांत हैं गपाटागॅझेटचें कम मोठ्या झपाट्यानें चाललें आहे, इतक्यांत कांहीं अंतरावरील एका दुकानासमोर एकच गडबड उडून गेली. यार महंमदाच्या दुकानांत जमलेली गर्दी क्षणार्धात मोडली. सारेजण तिकडेच धावले. जाऊन पाहतात, तो एक वृद्ध स्त्री एका हत्तीच्या माहुताला शिव्यांची लाखोली वहात आहे, आसपासचे लोकाहे त्या स्त्रीचा पक्ष घेऊन माहुतावर तुटून पडले आहेत व एकच हलकल्होळ माजला आहे. माहुत ह्मणाला " बाई, सतत तीन दिवस इत्तीला कांहीएक खायाला मिळाले नाहीं; रस्त्यांत फळांची टोपली पाहतांच भुकेने व्याकुळ झालेल्या हत्तीने फळे खाल्लीं; त्याला मी काय करूं ?" 6 ह्यातारी ह्मणाली "मेल्या, तुझं जळलं लक्षण ! तूंच मेल्या हत्तीकडून माझीं फळ -खाववस अन् माझ्या पोराबाळांचं अन्न नाहींसं केलंस. तुझं निसंतान होईल मेल्या ! " आणि ती स्त्री एवढी कातावून गेली होती, ती उगीच नव्हे. त्या बिचारीच्या कुटुंबाची सारी पोटगी त्या मस्त माहुताने हत्तीकडून बुन्द्या नष्ट करविली होती. जाणूनबुजूनच हत्तीकडून त्यानें तीं फळे खावत्रिीं होती; परंतु या त्याच्या कृतीबद्दल त्याला तरी दोष कां द्यावा ? अलीकडे वर्ष दीड वर्षांत हत्तीखान्याच्या खर्चाचा पैसा नियमितपणे असा कधींहि निळत नव्हता. तेव्हां दुसरा कांहीं मार्गच • नसल्यामुळे एकेक माहुत दोनतीन दिवसांच्या अंतराने आपापल्या हत्तीला बाहेर फिरवून अशा रीतीने त्याच्या खाण्याची व्यवस्था करित होता. याप्रमाणे लखनौच्या बाजारांत दररोज मारामारी, तकरारी, आणि दंगामस्ती चालली होती. आणि असे होण्याचे कारण बड्यासाहेबांची मेमच होय, असें मानून सारेजण तिची बिचारीची एकसारखी निंदा करित होते. लेकांच्या जिभेला हाड नसतें ह्मणतात तें खोटें नव्हे. लखनौची हवालदील प्रजा, रोसडेंटच्या मडमेसंबंध काय बोलत होती आणि काय नाहीं, त्यावें वर्णन करवत नाहीं ! ही सटवीच नबाबाचा खजिना लुटित आहे; ह्या सटवीनें मोहनी घालून नबाचास वेडा केलें