Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जनापवाद. ३७. कादर मियां, रमजान खान, मिरजां बेग प्रभृति एकामागून एकेक वक्ते आपापल्या नवीन नवीन बातम्या सांगूं लागून त्यांनी त्या बापड्यास आतांपर्यंत तोंड उघडण्यास अवकाशच मिळू दिला नाहीं. तेव्हां संतापून रोशन अल्ली मिरजां बेगच्या अंगावर ओरडून मध्येच म्हणाला “ मिर्जा चूप रहो ! ये सब बड़े घरकी बातां. हय. तुम्हारे इसके साथ क्या निसबत हय ? " रोशन अल्लीचें हें दरडावणीचें भाषण ऐकून वृद्ध हुसेन खां म्हणाला " मिर्जा,. या लखनौ शहरांत नबाब असफ-उद्-दौला याच्या वेळेपासून मी व्यापारउदीम करित आहे. या धंद्यांतच माझी दाढी सफेद झाली आहे. एवढ्या अवकाशांत मीं पुष्कळ पाहिले आहे आणि पुष्कळ ऐकिले आहे. शोबान अल्ला ! ह्या बंद्यानें त्यांतील एक शब्दहि कोणापाशीं उच्चारला नाहीं ! " हुसेन खांचें हें पुराण बरेंच लांबलें असतें; परंतु इतक्यांत तेथें फाटकी पगडी, तुटका अंगरखा आणि मळका पायजमा पेहेरलेला मुलारामसिंग नांवाचा नबाबाच्या महालांतील एक शिपाई येऊन दाखल झाला. त्याला पहातांच त्या गर्दीतून एकजण मोठ्याने ओरडला " आइये जनाब ! कुछ मिजाज तो अच्छी है । " दुसरा एकजण म्हणाला “ स्वारीचा अवतार तर पहा ! मळका पायजमा, जुना. अंगरखा, फाटकी पगडी " मुलाराम सिंग कष्टी मुद्रेनें म्हणाला " भाई ! दो बरस हुवा, एक पैसाथी तलब नहीं मिला. यह नौकरी बी छोड देना होगा. नबाब बडे साबको मेमको दररोज लाखो रुपिया देते हय, लेकिन नौकरलोगको तलब नहीं मिलता !" यावर एकजण म्हणाला “ अझून तीन वर्षे नोकरलोकांनां पगार मिळणार नाहीं. नवाब बड्या साहेबांच्या मडमेशीं निका लावणार आहेत; तिला दहा कोट रुपये दिले पाहिजत. 29 66 दुसरा म्हणाला दहा कोट रुपये । अ-ब-ब-ब-ब ! एक लाख रुपये खर्चि-- क्यास अशा पंचवीस मेम पायां पडत येतील ! जख्खड घेरडी मेम अन् तिला दहा कोट रुपये ? " तिसरा म्हणाला " भाई, तुं गोरागोमटा आहेस, तेव्हां कवडीहि दिल्याशिवाय मेम तुला माळ घालील ! तुझा सुंदर चेहरा पाहूनच कितीतरी मेम तुझ्यावर आशक. होतील ! ”