जनापवाद. आदराने वागत असे. त्यांतहि मोठमोठे अमीर उमराव, सरदार दरखदार, यांच्याशीं तर ती फारच आदरसंमान दर्शवित असे. नबाबासारख्यांशीं अर्थातच तिचें वर्तन फारच अदबीचें आणि प्रेमाचें असे. सांगावयाची गोष्ट एवढीच कीं, ती एतद्देशीय लोकांबरोबर मोकळ्या मनाने बोलत असे आणि तिचें मधुर भाषण श्रवण करावयास लोकहि उत्सुक असत. तिच्या ह्या प्रेमळ स्वभावामुळे नासिरुद्दीनाला या आंग्ल सुंदरीचा फार लळा लागला होता. तो वरचेवर तिच्या भेटीस जाई आणि तीहि मधून मधून नासिरुद्दीनाला भेटत असे. ही पतिव्रता इंग्रज स्त्री नासिरुद्दीनाला वरचेवर एकांतांत भेटत असल्यामुळे लखनौ येथील हिंदु काय, मुसलमान काय, आपापसांत नाना प्रकारचे तर्क वितर्क करूं लागले. विशेष स्नेह आणि आत्मीयता प्रदर्शित करतांना इंग्रज स्त्रिया नवव्याखेरीज इतर पुरुषाचेंसुद्धां चुंबन घेतात आणि त्यांनांहि आपले चुंबन घेऊं देतात, हा त्यांच्यांत एक रिवाजच आहे. त्याप्रमाणें रेसिडेंटच्या पत्नीनें आपल्या निष्कपट स्नेहाचे निदर्शक ह्मणून भोळ्या भावाने नासिरुद्दीनाचे कधीं चुंबन घेतले असेल, अगर त्याला आपले चुंबन घेऊ दिले असेल; परंतु अयोध्येच्या लोकांस एवढीच गोष्ट पुरे झाली. त्यांनी तिच्यावर वाल्मिकीप्रमाणे मोठें थोरलें रामायण रचिलें ! मुखचुंबन झाले तेव्हां अर्धा निका लागला, असेंच ते ह्मणूं लागले. इंग्रजी आचाराविचाराप्रमाणे पहातां मुखचुंबनाचें विशेष महत्त्व नाहीं, हे त्या बेट्या गांवढळांनां काय ठाऊक ? लखनौ येथे कंडी उठली की बादशहानें रेसिडेंटास दोन कोटी रुपये दिले. रेसिडेंट साहेबाने आपली बायको नबाबास विकत दिली आहे. साहेब लवकरच विलायतेस जाणार आहेत व दुसरी बायको करणार आहेत. ही कंडी पहिल्याने नबाबाच्या महालांतील हलक्या नोकरांत उठली व त्यांनींच ती गांवभर केली. सुमारें एक महिनापर्यंत आहम्मक उल्ला, बकसू रहीम, आजिम अल्ली, नियामत खां, आणि नबाबाचा बबर्ची रोशन अल्ली हे बाजारांत " देखो मिर्जा, यह बात किसीकू कहना मत !" असें ह्मणून भेटेल त्या प्रत्येकाला गांठून ही सारी गोष्ट त्याच्या कानांत सांगत होते व ही बड्या घरची गोष्ट कोणापाशींहि न बोलण्याविषयीं प्रत्येकाला तीन तीनदा अगदीं निक्षून बजावित होते. हां हां ह्मणतां ही गुप्त बातमी ज्याच्या त्याच्या तोंडी झाली. त्यावेळी आजच्यासारखी वर्तमानपत्रे नव्हतीं; आजच्या वर्तमान पत्रांत तारायंत्राच्या द्वारें अगदीं ताज्या बातम्या प्रसिद्ध होऊन क्षणार्धात
पान:ही रामाची अयोध्या.pdf/३१
Appearance