Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जनापवाद. ३३ "अयोध्येचे सार्वभौम बादशहा' ह्मणवून घेतले. परंतु बिचारा गाझीउद्दीन हा सार्वभौमत्वाचा मान भोगण्यास फार वर्षे जगला नाहीं. बापाने सांठवून ठेविलेले एवढे मोठे पैसे गेले त्याचे त्यानें दुःख घेतले व त्या द्रव्यशोकांतच बापड्याचा अकाली अंत झाला. सादतअल्ली हा अतिशय कडक, कार्यदक्ष आणि मोठा काटकसरी स्वभावाचा होता. पैसा पैसा जमवून त्यानें मरतेवेळी खजिन्यांत चौदा कोट रुपये सांठविले होते. गाझीउद्दीन बापासारखा कार्यदक्ष जरी नव्हता, तरी विलासी नव्हता; परंतु प्रस्तुतचे अयोध्याधिपति नासिरुद्दीन हैदर ह्याचा स्वभाव आाजाच्या आणि बापाच्या स्वभावाच्या अगदीच विरुद्ध होता. बाळपणापासूनच सर्व व्यसनांचें याला बाळकडू मिळाले होतें. नाना प्रकारांच्या भ्रष्टाचारांचें आगरच अशा नवाबाच्या झनान्यांत तो वाढला होता; लाज, भीति, पापपुण्य यांनां जलांजली वाहिलेल्या, सुरासक्त, पशूदेहधारी फिरंगी आणि एत्तद्देशीय कुलांगारांनी ज्याला सदासर्वकाळ वेढलेलें, तो आपल्या तारुण्यांत कशा प्रकारे वागत असावा, ह्याचा वाचकांनीं आपल्या मनाशींच तर्क करावा. त्याच्या दुश्वरित्राचें वर्णन करून लेखणी विटाळ- ण्याचें पातक आह्मी करित नाहीं. नासिरुद्दीन हा दुराचारी व हलकट अशा कित्येक फिरंगी लोकांच्या संगतीला लागून अगदीं बहकून गेला आहे असें पाहून त्याच्या बापानें त्याला राज्यभ्रष्ट कर- ण्याचा प्रयत्न केला होता. एकदा तर त्याला ठार मारून टाकण्यासहि तो प्रवृत्त झाला होता. परंतु गाझीउद्दीनाच्या मुख्य बेगमेने मोठ्या कौशल्यानें यावेळी नासीरचे प्राण वांचविले. गाझीउद्दीनाचा तो हेतु तडीस जाता, तर अयोध्येच्या प्रजेवर एवढा जुलूम झाला नसता; परंतु असे ह्मणणहि व्यर्थ आहे. भवितव्यता कोणाला चुकवितां येणार आहे ! गादीवर बसतो न बसतो तोच ह्या दिवढ्या बादशहानें खजिन्यांतल्या दोन कोट रुपयांचा फडशा उडविला. अर्थात्, खजिन्यांत जी कांहीं थोडीबहुत शिल्लक होती नव्हती ती सर्व फस्त झाली. एवढ्या अल्प अवधीत दोन कोट रुपये कशा प्रकारें खर्चण्यांत आले, ते कोणाला समजलें नाहीं. त्या वेळच्या लखनौच्या रेसिडेंटच्या बायकोला हे रुपये अर्पण करण्यांत आले, असाच लोकांचा सर्वसाधारण समज आहे.