ही रामाची अयोध्या ! प्रकरण ३ रें. जनापवाद
- This 'greatest of his friends' was a former resident
with whom the King had been on very intimate terms ; let us call him Mr. Smith; that name will do as well as any other. Mr. Smith had a very captivating wife; and scandal did say that the King was fonder of Mrs. Smith than of her husband. U -W. Knighton. इसवी सन १८२७ साली गाझीउद्दीन हैदर मरण पावला व त्याचा दिवट्या पुत्र नासिरुद्दीन हैदर हा अयोध्येचा अधिपति झाला. गाझीउद्दीनाच्या मृत्यूपूर्वीच अयोध्येचा खजिना कोरडा ठणठणीत झाला होता. बापानें सांठविलेले कोडो रुपये ईस्ट इंडिया कंपनीला अर्पण करून गाझीउद्दीनाने इंग्रजांमार्फत 'अयोध्येचे सार्वभौम बादशहा' अशी मोठ्या मानाची पदवी प्राप्त करून घेतली होती. गाझीउद्दीनापूर्वीचे नबाबांस 'नबाब वजीर' एवढीच पदवी होती. ते जरी स्वतंत्रपणे राज्यकारभार करित असत, तरीहि दिल्लीच्या सार्वभौम बादशहाचें मांडलिकत्व कायदेशीर रीतीनें त्यांनां सुटलें नव्हते. ईस्ट इंडिया कंपनीनें गाझीउद्दीनाकडून कोट्यवधि रुपयांचे कर्ज घेतलेलें; अर्थात, गाझीउद्दीनाचे इंग्रजांवर अगणित उपकार झाले होते. ह्या उपकारांची फेड केल्याविना त्यांनां स्वस्थता न वाटणे साहजिकच होतें. इंग्रजांनी गाझी उद्दनास लिहिले की “ नबाब वजीर ही पदवी धारण करून आपल्या तोंडाने दिलीच्या बादशहाचें मांडलिकत्व कबूल करण्यासारखे आहे. यासाठी तुझीं बादशहा ही पदवी धारण करावी, ह्मणजे दिल्लीच्या बादशहाचे मांडलिकत्वाचा दोष रहाणार नाहीं !” गाझीउद्दीनास ही सल्ला फारच पसंत पडली. इंग्रजांच्या या आभाराबद्दल त्यांनां सर्वं कर्ज माफ करून त्यानें मोठ्या समारंभानें आपल्याला
- ा पूर्वीचा रेसिडेंट नबाबाचा अगदी दिलजान दोस्त असून त्याच्याशीं नासि-
रुद्दीनाची अत्यंत सलगी होती. आपण त्याला स्मिथ असे कल्पित नांव देऊं; खऱ्या नांवाशींच आपले काय अडलें आहे ? ह्या स्मिथची बायको अत्यंत चित्ताकर्षक होती. आणि नबाब मि० स्मिथंपेक्षां मिसेस स्मिथवरच अधिक भाळला होता, असा जनापवाद होता. -डब्ल्यु. नाईट.