Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

योग्याचा आश्रम. ३१ मानकुमारांची ही दशा झाली आहे. त्या पिशाचामुळेच हजारों कुलस्त्रियांना सतीत्वापासून भ्रष्ट व्हावे लागले आहे.” (6 प्रयत्न करशील तर मृत्यूच्या मुखांतून त्याच्या स्त्रीपुत्रांचें तूं रक्षण करूं शकशील." " मी कशा रीतीनें समर्थ होईन ? ” “ योग्य वेळीं तें तुझें तुलाच कळून येईल. आतां तूं विलंब न करितां अयोध्ये जा. काल तुला जें सांगितले आहे त्याप्रमाणें वर्तन कर.” गुरुचरणांला कृतज्ञबुद्धीनें प्रणाम करून शिष्य सजल नयनांनीं निघून गेला.