३० ही रामाची अयोध्या ! " नाहीं ! हा जुलूम केव्हांहि नाहीसा होणार नाहीं. कर्माची फळे भोगल्याविना सुटावयाचीं नाहींत ! " " असे जर आहे, तर मग त्या पापी राज्याचा त्याग करणेंच श्रेयस्कर आहे.. ह्मणजे आपोआप सर्व दुःखांचा अंत होईल.” " बेटा ! संसारांतील या भयंकर आधीव्याधींनीं तुला हिताहित ज्ञानशून्य करून टाकिलें आहे. तुं कर्तव्यपथाचा अवलंब कर. "" "नरकसमान अशा त्या नबाबाच्या महालांतून मानकुमारीचा उद्धार करण्यास. समर्थ झालों नाहीं, तर खात्रीनें मी प्राणत्याग करीन! " 26 'बेटा, तुं चिंता करूं नको, मानकुमारीचें रक्षण मी करीन.” " कसे कराल ?" “त्याची तुला काळजी नको ! सिंहाच्या गुहेतून, वाघाच्या जवड्यांतून ती निर्भयपणें परत घरीं येईल.” " 'प्रभो, आपले भाषण केव्हांहि मिथ्या होणार नाहीं. तथापि ह्या गोष्टी-- विषयीं संशय येतो! मानकुमारी सुरक्षितपणें घरीं येण्याचा संभव आहे ? त्या इंद्रियासक्त, पातकी नासिरुद्दीन हैदराच्या रंगमहालांत राहून आपल्या पातिव्रत्याचें रक्षण करण्यास ती बिचारी कोमल बालिका समर्थ होईल ? ” गुरु हंसून ह्मणाले “ रावणाच्या घरीं सीता देवीनें सतीधर्माचे रक्षण केले नाहीं काय ? " “आपण काय ह्मणतां, तें मला कळत नाहीं. त्या सुकुमार बालिकेला आत्मरक्षण करण्याचें यत्किंचितहि सामर्थ्य नाहीं ! "" "बेटा, असा भांबावूं नकोस ! मनुष्यावर आलेले घोर संकट हाच त्याच्या उद्धाराचा सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक होय. संकट है अबलांनां सबल करतें, अप्रबुद्धांनां प्रदुद्ध करतें, हतवीर्यानां पराक्रमी करतें. मी खात्रीनें सांगतों, ह्याच बालिकेच्या छळामुळे दर्शनसिंहाचा कुळक्षय होईल. दुरात्म्या नासिरुद्दीनाचाहि संहार होईल. " “ राजा दर्शनसिंहाच्या बायकामुलांचाहि नाश होईल ? बिचाया त्याच्या निरापराध स्त्रीपुत्रांचा प्राणनाश व्हावा, अशी माझी मुळींच इच्छा नाहीं. परंतु चांडाळ दर्शनसिंहाला मात्र हालहाल होऊन मरण यावें, अशी रात्रंदिवस मो परमेश्वराची प्रार्थना करित आहे. त्या दुष्टाच्या घोर दुष्कर्मामुळेच
पान:ही रामाची अयोध्या.pdf/२६
Appearance