Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४. PC ही रामाची अयोध्या ! 7 गाझीपुरच्या या सच्चिदानंद स्वामींची कीर्ति काशीनाथानें ऐकिली होती; परंतु यापूर्वी त्यांनां प्रत्यक्ष कधींहि पाहिले नव्हतें. गाझीपुरच्या निबिड अरण्यांत पर्वतांच्या गुर्हेत सच्चिदानंद नांवाचे कोणी महापुरूष ध्यानस्त बसून तपश्चर्या करित असतात; हे कांहीएक खात नाहीत किंवा कोणाशीं एक अक्षरहि बोलत नाहीत; सदा सर्वकाळ निमिलित नेत्रांनीं ईशचितनांत निमन असतात, इत्यादि त्यांची कीर्ति काशीनाथानें कैक मनुष्यांच्या तोंडून ऐकिली होती. असे सत्पुरुष आपण होऊन आपल्या दर्शनाचा अलभ्य लाभ आपल्याला द्यावयाला आले आहेत, हे कळून येतांच काशीनाथ व त्याच्या कुटुंबांतील मंडळीस जो महदानंद झाला त्याचे वर्णन करणें व्यर्थ आहे! या सत्पुरुषाच्या पदरजाने आपली राजधानी पुनित व्हावी ह्मणून इंदूरचे राजे होळकर यांनीं ह्मणे यांच्यापाश कैक दिवस धरणे धरले होते; परंतु सतत तीन वर्षेपर्यंत ह्या महापुरुषाचा ध्यानभंग झाला नाही. केव्हां केव्हां तीनतीन चारचार वर्षे हे समाधी लावून बसत असतात, वगैरे वगैरे यांच्याविषयींची अनेक कीर्ति काशीनाथानें ऐकिली होती. असे सत्पुरुष आपल्या घरीं चालत आले आहेत ही आपणा अभाग्याचे घरीं कामधेनूच आली असे वाटून काशीनाथ मोठ्या • तांतडीने उठून संन्याशाला आणण्यास गेला. काशीनाथ बाहेर येऊन पहातो, तो दरवाजांत अयोध्यानाथ उभा आहे! “अयोध्या नाथ, अयोध्यानाथ ! " असे गहिवरून ह्मणत काशीनाथानें संन्याशाला गाढालिंगन दिले. नंतर ते उभयतां घरांत गेले. आज पंचवीस वर्षांनी आपल्या सहोदर बंधूला पाहून कैलासेश्वरीच्या नेत्रांतून आनंदाश्रु वाहू लागले. नारायणकुमारी आणि चांदकुमारी यांनी स्नेहपूर्वक अयोध्यानाथाला अनेक प्रश्न विचारले वृद्ध बुन्दिया वेडी होऊन अयोध्यानाथांच्या सर्वांगावरून हात फिरवूं लागली. काशीनाथाचा एकंदर परिवार अयोध्यानाथाच्या दर्शनाने आनंदसागरांत पोहूं लागला. पुष्कळ वर्षांनी भेटलेल्या आपल्या प्रिय बंधूला नानाप्रकारची मिष्ठान्ने वाढून तृप्त करुं अशी कैलासेश्वरीची फार इच्छा होती; परंतु अयोध्यानाथानें आज पंचवीस वर्षांत अन्नोदकाला स्पर्शहि केला नव्हता ! मानकुमारीच्या मृत्युसमयीं निराहाराने ईशचिंतन करित आपले शेष आयुष्य घालविण्याची त्यानें घोर प्रतिज्ञा केली होती. अर्थात्, कैलासश्वरीची ती इच्छा पूर्ण झाली नाही. सात दिवस काशीनाथाच्या घरीं वस्ती करून आणि सर्वोस नानाप्रकारें पारमार्थिक विषयाचा उपदेश करून नंतर अयोध्यानाथ हिमालयांत निघून गेला.