उपसंहार. २४३ पुढे इंग्रज सेनापतीने अयोध्येचा गादीवारस मना जान याच्या हातापायांत बिया ठोकून आणि अयोध्येची वृद्ध पादशा बेगम जनाचे आकि हिला कैद करून ह्या दोघां राजकैद्यांस रेसिडेन्सींत नेऊन ठेविलें. या ठिकाणीं तीं चार दिवस बंदिवासांत होतीं. पुढे त्यांनां कानपुर येथें अटकेत ठेविलें. याप्रमाणे नासिरुद्दिनाच्या कारकिर्दीचा अंत होऊन अयोध्येच्या गादीवर वृद्ध महमद अल्ली याची नेमणूक करण्यांत आली. नासीरच्या अमदानीतील सर्व अधिकान्यांस बडतर्फ करून हकीम मेहेंदी अल्लीखांला पुनः प्रधानपदावर नेमण्यांत आलें. अफझल उलानसा ही आतां मुसलमानी नांव टाकून गंगा हें नांव धारण करुन आपली आई बुन्दिया हिच्याबरोबर काशीनाथाच्या घरी राहूं लागली. तिच्या मागच्या वर्तनाबद्दल, त्याचप्रमाणे ती मुसलमान झाल्याबद्दल काशीनाथानें तिचा तिरस्कार न करतां तिला आपल्या घरीं आश्रय दिला व तिचा पुढील आयुष्यक्रम सत्पथाकडे वळविला. काशीनाथ हल्ीं काशींत रहात होता. त्याला एक पुत्र आणि एक कन्या झाली होती. मुलगा थेट मामाच्या वळणावर गेला होता. त्याचा तोंडवळा कैलासेश्वरीच्या तोंडवळ्यासारखा होता. गेल्या १८५७ सालच्या बंडाच्या वेळीं काशीनाथाच्या ह्या मुलाचे वय सुमारें वीस वर्षांचें होतें. आतां तो हुबेहुब पंडित अयोध्यानाथा- सारखा दिसत होता. काशीनाथाच्या कन्येचा तोंडवळा मात्र आईच्या वळणावर न जातां बापाच्या वळणावर गेला होता. ती हुबेहुब मानकुमारीसारखी दिसत असे. ह्मणून काशीनाथाच्या दोघी बहिणी राणी नारायणकुमारी आणि चांदकुमारी ह्या आपल्या भावाच्या ह्या मुलीला 'मानकुमारी मानकुमारी' ह्मणून मोठ्या प्रेमानें हृदयाशीं धरित असत. काशीनाथाच्या कन्येचें नांव मानकुमारी आणि पुत्राचें नांव अयोध्यानाथ असेच ठेवण्यांत आले होतें. काशीत काशीनाथ आपला काल साधुसंतांच्या सेवेशुश्रुषेंत, घर्मसाधनांत आणि परोपकारांत घालवूं लागला. त्याच्या घरी रोज कोगीना कोणी साधुसंन्याशी असावयाचाच. काशीनाथाची पत्नी आणि दोघी बहिणी यांनांहि साधुसेवा करण्यांत आपल्या आयुष्याची सार्थकता वाटत असे. याप्रमाणे यांचा नित्यक्रम चालला असतां एके दिवशीं काशीनाथाचा एक नोकर घरांत येऊन सांगूं लागला को " बाहेर गाझपुरचे सच्चिदानंद नांवाचे कोणी एक तेज:पुंज संन्याशी आले आहेत, व आपल्याला भेटण्याची त्यांची इच्छा आहे. "
पान:ही रामाची अयोध्या.pdf/२४२
Appearance