ही रामाची अयोध्या ! स्पष्ट दिसत आहे. शिष्य अद्यापि चर्मचक्षूंनींच पहात आहे; परंतु गुरूच्या चर्येवरून त्याला अंतर्दृष्टि प्राप्त झाल्याचा स्पष्ट बोध होत आहे. आतां आपले हे तर्कवितर्क क्षणभर आपल्याशींच ठेवूं व ते काय बोलतात तें ऐकूं. "बेटा, हृदयांतील दुःख दूर करून, परमेश्वराचें चिंतन कर. सुखदुःख हे मानवीमनाचे विकार होत. ह्या सुखदुःखामुळेच मानव अधोगतीला जातो. ज्याप्रमाणें शीतोष्णादि विकार शरीरावर परिणाम करून त्यापासून देहामध्येंदि नाना रोगांचा उगम करितात, त्याप्रमाणेच हें सुखदुःख मानसिक उपाधी उत्पन्न करित असतें.” " प्रभो, परंतु मनांतील दुःख कांहीं केल्या शांत होत नाही!” 66 तर मग तूं स्वदेशीं जा. ह्या अत्यंत बिकट अशा योगमार्गाचे तुझ्यानें अवलंबन करवणार नाही.' "" गुरूच्या तोंडून हे उद्गार ऐकतांच शिष्याचे डोळे भरून आले. सजल नयनांनी गुरूच्या मुखाकडे पहात तो स्तब्ध राहिला. गुरूच पुढे ह्मणाले " तूं आतां येथे राहूं नको, एकदम आपल्या देशीं जा. तुझ्या हृदयांतील मोहांधकार अद्यापि दूर झालेला दिसत नाहीं." गुरूची ही निकराची आज्ञा ऐकतांच शिष्यानें तत्क्षणीं गुरुचरणांवर मस्तक ठेवून "माता असा ह्मणायला मला देश तरी कोठे आहे ? आतां स्मशान हाच माझा देश आणि ह्या भागीरथीचें पात्र हेंच मला मातेचा अंक होय! मला अनाथ बालकाला मातेच्या अंकावरून दूर कां लोदितां प्रभो ? गुरु किंचित् हास्य करून झणाले "घोर अशा पातकापासून तुझा उद्धार " करण्यासाठीं ! " " तर मग माझी प्रार्थना पूर्ण करा.” "तें सामर्थ्य मला नाहीं." 46 आपण मनांत आणाल तर करूं शकाल." " तूं अगदर्दी मूर्ख दिसतोस ! अरे, योगबलानें प्राप्त झालेली शक्ति का कोणाला दुसऱ्याला देतां येणार आहे? योगबलानेंच ती प्राप्त करून घेतली पाहिजे. " किती वर्षांनी ती मला प्राप्त होईल ? " "2 • तुझ्या मानसिक स्थितीवर अवलंबून राहील. वेळीं पन्नास वर्षांनीसुद्धां तूं ती प्राप्त करूं शकणार नाहींस!”
पान:ही रामाची अयोध्या.pdf/२४
Appearance