उपसंहार. प्रकरण २४ वे. उपसंहार. I slept and I dreamt that life is beauty, I awoke and found it is full of duty. राजा दर्शन सिंहाला हद्दपार केल्यावर नासीरची आई पादशा बेगम जनाबे आलि हिची फैजाबाद येथे रवानगी करण्यांत आली. मना जान हा जनावे आलि बरोबरच होता. त्याच्या नाशाचे सर्व प्रयत्न विफल केले पाहून बादशहानें जाहिरनामे लावून मना जान हा आपला औरस पुत्र नव्हे, बेगमांच्या कारस्थानांमुळे आपण त्याला आजवर आपला पुत्र मानिला होता, असें सर्वत्र जाहिर केलें. विलायती नापितराज सर्फराजखां याचा बादशहाच्या इतर आंग्ल दोस्त मंड- काशीं आतां घोर कलह सुरू झाला. यापुढें अयोध्येत रहाण्यांत शोभा उरली नाहीं, हैं नापितराजांरा दिसूं लागलें. लखनौ येथें बादशहाच्या दरबारांतील कुटिल कारस्थानी- मंडळति चारपांच तट उपस्थित होऊन प्रत्येक तटांतील लोक दुसऱ्यास रसातळास पोहोचविण्याची कृष्ण कारस्थानें रचण्यांत गहून गेले. एका तटानें माजी वजीर मेहेंदी अलीखांचा पक्ष स्वीकारला. दुसरा तट राजा दर्शनसिंहाच्या उद्धाराची खटपट करूं लागला. बेगमांच्या बाजूस तिसरा तट वळला. चौथ्याने न्हाव- गंड्याचा आश्रय स्वीकारला. साऱ्या राज्यावर तिलांजली वाहण्यास उद्युक्त होऊन इंग्रजांच्या कारस्थानांत सामील झालेला तट आणखी होताच ! ह्या सर्व तटांतील कपटकारस्थानी मंडळीने आपापला स्वार्थ साधण्यासाठी न्यायान्याय, पापपुण्य यांनां तिलांजली वाहून जी अघोर कर्मे आरंभिली, त्यांचे वर्णन करण्यास आमची लेखणी धजत नाहीं ! दर्शनसिंहाच्या हद्दपारीनंतर दोनतीन वर्षांनी नामितराजांनी सहा महिन्यांची रजा घेऊन कलकत्यास प्रयाण केलें. कलकत्यास गेल्यावर त्यांनी आजवर उपार्जन केलेल्या ऐशी नव्वद लक्ष रुपयांपैकी कांहीं रुपये कित्येक निरनिराळ्या व्यांकांत ठेविले व बरेचसे विलायतेस पाठवून दिले. रजा घेऊन अयोध्या सोडण्यापूर्वी नापितराजांनी आपल्या कनिष्ट बंधुराजांची बादशहाच्या क्षौरकार्यावर योजना केली होती; परंतु त्यांचे हे बंधुराज विशेष से चतुर नव्हते. बादशहाचें प्रियपात्र होऊन बसण्यांत त्यांनां सिद्धि आली नाहीं. सर्फराज खांच्या पश्चात् नासीरच्या इतर आंग्ल दोस्तमंडळीने सर्फराजखांला पदच्युत
पान:ही रामाची अयोध्या.pdf/२३८
Appearance