Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३८ ही रामाची अयोध्या ! पूर्वपरंपरा आहे तो निश्चयेंकरून आविष्कृत होईल आणि सांप्रदायिक भाव, मतभेद आणि धर्मयुद्धे जगांतून लवकरच अदृश्य होतील. " बेटा काशीनाथ ! ही धर्मपिपासा परितृप्त करण्याची तुला जर वासना असेल, तर पहिल्याने संसारांतील विविध कर्तव्यें यथासांग संपादन करून नंतर मग संसाराच्या मोहांतून अगदी अलिप्त होत होत एकांतांत ईश्वरचिंतनांत आपले शेष आयुष्य घालीव. " या जगतांत आतां तुझांला माझी भेट व्हावयाची नाहीं. परंतु कांहीं संकट उपस्थित झाल्यास माझें स्मरण करतांच तुमच्या हृदयांत शुभबुद्धीचा उदय होऊन तुझांला सुमार्ग दिसेल. आणखी माझ्यापाशीं कांहीं मागूं नको ! देण्याजोगें होतें तें सर्व मी अगोदरच देऊन चुकलो आहे. जगन्नाथशास्त्री. " " पत्र वाचून होतांच काशीनाथानें तें गंगाप्रसादाच्या हातीं दिलं. पत्राच्या खालील ' जगन्नाथशास्त्री ' हें नांव वाचून गंगाप्रसाद म्हणाला " हे बाबांचेंच अक्षर ! " त्याने ते पत्र एकदम मस्तकावर धरले व सद्गदित अंतःकरणाने पितृदेवाला शतशः प्रणाम केले. त्या पत्रामुळे गंगाप्रसादाच्या उद्विग्न चित्ताला बराच शांतिलाभ झाला. हळुहळू धैर्यवलंब करून तो संसारकार्यात लक्ष्य घालूं लागला. मानकुमारीच्या मृत्युनंतर सदासर्वकाल कैलासेश्वरी गंगाप्रसादाजवळ राहून अत्यंत प्रेमाने त्याची सेवा- शुश्रूषा करूं लागली. कैलासेश्वरीचा मधुर स्वभाव, हृदयाचा पवित्र भाव, आत्मयाग आणि परसेवेविषयीं तिची प्रगाढ इच्छा पाहून गंगाप्रसादाने एके दिवशीं काशीनाथाला जवळ बोलावून म्हटले “ बाबा, मानकुमारी देवकन्या होती. तिन तुझ्यासाठी योग्य वधु निश्चित केली आहे. कैलासेश्वरचेिं तूं पाणिग्रहण कर. " वडिलांची आज्ञा काशीनाथानें शिरसा वंद्य केली. लवकरच दोनतीन महिन्यांनी काशीनाथाचा कैलासेश्वरीशीं विधिपूर्वक विवाह झाला. पुढे गंगाप्रसाद आपला पुत्र, स्नुषा आणि दोघी कन्या यांनां बरोबर घेऊन काशींत जाऊन राहिला. वुन्दियाहि कैलासेश्वरीबरोबरच राहिली. गंगाप्रसाद नंतर सीतापुरला गेला नाही. काशींतच राहून तो ईश्वरचिंतनांत आपलें शेष आयुष्य घालवू लागला. याप्रमाणे ईश्वरचिंतनांत आणि काशीनाथाच्या पुत्रकन्यांचे कौतुक करण्यांत त्यानें आपल्या आयुष्याचे शेष दिन सुखानें घालवून कांहीं वर्षीनीं काशीच्या पुण्यभूमीत देह ठेविला.