Jump to content

पान:ही रामाची अयोध्या.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महापुरुष. २३७ नरहत्या हेच धर्मसाधन वाटत असते! मी जगांतील नाना देशांत पर्यटन केले आहे." भिन्न भिन्न लोकांच्या धर्मसाधनमार्गांचें पर्यालोचन केले आहे. हे सर्व मार्ग प्रत्यक्ष पाहिल्यावर पृथ्वीतील सर्व संप्रदायांत श्रीबुद्धदेवांनी प्रचारांत आणलेले एकांतात ईश्वरचिंतन हाच सर्वोत्कृष्ट साधनमार्ग आहे, असे मला वाटू लागले आहे. बुद्धाचे अनुयायी पुष्कळ आहेत; पुष्कळ देशांतहि बुद्धधर्म प्रचारांत आहे; परंतु हे भिन्न भिन्न देशांत रहाणारे आणि आपल्याला बौद्धधर्मीय ह्मणविणारे लोक कोणीहि बुद्धदेवांनी सांगितलेल्या सावनमार्गाचें अवलंबन करितांना मला आढळले नाहीत! उलट, ह्यांचे आचारव्यवहार आणि धर्मसाधनाचे मार्ग बौद्धधर्माच्या संपूर्ण विपरीतच दिसून आले. " मला पूर्वी वाटत असे की, एका एका देशांत एका एका महापुरुषाने जन्म ग्रहण करून एकेक स्वतंत्र धर्मच प्रचारांत आणिला असेल; परंतु आतां मला कळून चुकलें कीं, हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती आणि मुसलमान ह्या चार धर्मोचा पितापुत्रांतील संबंधाप्रमाणें अत्यंत निकट संबंध आहे. हिंदूंचा उपनिषद प्रतिपादित सनातनधर्म कालक्रमानें विकृतावस्थेस पोहोचल्यामुळे महापुरुष बुद्धदेवांनी धर्मसंस्कारक होऊन त्या उपनिषद प्रतिपादित सनातन धर्माचें पुनरुथ्थान केले. हा पुनरुथ्थित सनातन धर्मच बौद्धधर्म झाला. कालक्रमानें बौद्धधर्मालहि विकृतावस्था प्राप्त झाल्या- वर बौद्धऋषि योहनापार्शी दीक्षा घेऊन येशू ख्रिस्तानें विशुद्ध बौद्धधर्माचा प्रचार केला व त्या विशुद्ध बौद्धधर्मालाच स्त्रिस्तीधर्म असे नामाभिधान प्राप्त झालें. या ख्रिस्तीधर्मालाहि पुढे विकृतावस्था प्राप्त झाली व ख्रिस्ती धर्मावलंबीयांमध्यें मतभेद उपस्थित होऊन घोर रणें माजलीं. यांतील नेस्टेरियन मतावलंबीयांना हद्दपार करण्यांत आल्यामुळे ते अरबस्थानांत येऊन राहिले व यांच्यापाशींच धर्मारीक्षण घेऊन महंमद पैगंबरानें महंमदी धर्माचा प्रचार केला. यावरून स्पष्टपणे दिसून येतें कीं, या चान्ही धर्माचा अत्यंत निकट संबंध असून परस्परांचे परस्परांशीं पितापुत्राचें नातें आहे. वेदांपासून उपनिषदांची उप्तत्ति झाली, उपनिषदांपासून बौद्धधर्म आला, बौद्धधर्मापासून ख्रिस्ती व पुढे ख्रिस्तीधर्मापासून महंमदीधर्म असा हा उत्पत्तिक्रम आहे. पाश्चात्य विद्वानांनी अनेक शोध, अनुसंधान आणि तर्क करून निश्चित केले आहे कीं, आणखी शंभरदोनशें वर्षांचा काल लोटण्यापूर्वीच पृथ्वीवरील धर्म- राज्यांत पूर्णैक्य संस्थापित होईल. भिन्न भिन्न धर्मीमध्ये अशाप्रकारें जो संबंध आणि